Search This Blog

Wednesday, 26 November 2025

चाईल्ड हेल्पलाईन 1098 व सखी वन स्टॉप सेंटर 181 बाबत जनजागृती कार्यक्रम

 


चाईल्ड हेल्पलाईन 1098 सखी वन स्टॉप सेंटर 181 बाबत जनजागृती कार्यक्रम

चंद्रपूर, दि. 26 : जिल्हा महिला व बालविकास अधिकारी मिनाक्षी भस्मे, यांच्या मार्गदर्शनाखाली बेटी बचाओ बेटी पढाओव बालविवाह प्रतिबंध अभियान अंतर्गत चांदा पब्लिक स्कूल येथे चाईल्ड हेल्पलाईन 1098 व सखी वन स्टॉप सेंटर 181 बाबत जनजागृती कार्यक्रम आयोजित करण्यात आला.

कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून चांदा पब्लिक स्कूलच्या प्राचार्य आम्रपाली पडोळे, तर प्रमुख अतिथी म्हणून परिविक्षा अधिकारी दिवाकर महाकाळकर व चांदा पब्लिक स्कूलचे सर्व शिक्षक वृंद व विद्यार्थी विद्यार्थिनी ही उपस्थित होते.

याप्रसंगी अभिषेक मोहुर्ले यांनी युट्युबवर असलेली गुड टच व बॅड टच स्टोरी विद्यार्थ्यांना दाखविली. यावेळी ते म्हणाले, आजचे बालक सुरक्षित असले पाहिजे. बालकांना कुठेही शारिरीक, मानसिक सामाजिक समस्या येत असेल अशावेळी चाईल्ड हेल्पलाईन 1098 ही यंत्रणा बालकांचे संरक्षण करण्याचे कार्य करित असते. बालकांनी फ्रेंड्स बनविले पाहिजेत, आपल्या भावना शेअर केल्या पाहिजेत, परंतु बार्डर लाईन कधीही क्रॉस करू नये. आपल्या ध्येयापासून विचलित होऊ नये. सोशल मिडियाचा वापर जपून करावा, अथवा करू नये.

मार्गदर्शन करतांना सखी वन स्टॉप सेंटरच्या राणी खडसे यांनी बालकांशी हितगुज करित सखी वन स्टॉप सेंटर व महिला हेल्पलाईन 181 कार्याबाबत बालकांना माहिती दिली.  सदर कार्यक्रमाचे आयोजन चांदा पब्लिक स्कूल चंद्रपूरद्वारे करण्यात आले, यावेळी कार्यक्रम आयोजनाचे प्रभारी म्हणून फहिम शेख आणि रूहिना तबस्सूम यांनी जबाबदारी पार पाडली. कार्यक्रमाचे संचालन श्रावणी चिकटे व अंतरा पारखी या विद्यार्थ्यांनी केले तर आभार तनिष्का बुरण या विद्यार्थीनीने मानले.

०००००००

No comments:

Post a Comment