Search This Blog

Thursday, 20 November 2025

परिपूर्ण पर्यावरण प्रदूषण निर्देशांकाबाबत जिल्हाधिका-यांकडून आढावा


परिपूर्ण पर्यावरण प्रदूषण निर्देशांकाबाबत जिल्हाधिका-यांकडून आढावा

चंद्रपूरदि. 20 : जिल्ह्यातील परिपूर्ण पर्यावरण प्रदूषण निर्देशांकाबाबत जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सीयांनी आढावा घेतलाजिल्हाधिकारी कार्यालयात पार पडलेल्या या बैठकीला प्रभारी मनपा आयुक्त डॉविद्या गायकवाडमहाराष्ट्र प्रदुषण नियंत्रण मंडळाचे प्रादेशिक अधिकारी उमाशंकर भदुलेजिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी शंकर तोटावारजिल्हा आरोग्य अधिकारी डॉअशोक कटारेजिल्हा शल्य चिकित्सक डॉमहादेव चिंचोळेप्रादेशिक परिवहन अधिकारी किरण मोरेकार्यकारी अभियंता अक्षय पगारेवाहतूक निरीक्षक प्रवीणकुमार पाटीलतसेच महाऔष्णिक विद्युत केंद्रवेकोलिचंद्रपूरवणीबल्लारपूर क्षेत्रपरिसरातील इतर उद्योगांचे प्रतिनिधी आदी उपस्थित होते.

यावेळी जिल्हाधिकारी श्रीगौडा म्हणालेचंद्रपूर अतिप्रदूषित क्षेत्रात अस्तित्वात असलेल्या उद्योगांनी हवा प्रदूषण नियंत्रण व्यवस्था व्यवस्थित चालवावीतसेच वायु प्रदूषणाचे स्त्रोत जसे की घरगुतीहॉटेलढाबे व रेस्टॉरंट मध्ये बेकायदेशीरपणे जाळण्यात येणारा कोळसानागरी परिसरामध्ये उघड्यावर घनकचरा जाळणे तसेच बांधकामामुळे होणारे वायु प्रदूषण या बाबींची वेळोवेळी पाहणी करण्याकरिता ग्रामीण व शहरी भागांसाठी दोन वेगळे भरारी पथक स्थापन करावेसार्वजनिक बांधकाम विभागाने चंद्रपूर शहरामधून होणाऱ्या अवजड वाहतूकीकरिता योग्य त्या उपाययोजना कराव्यात.

प्रादेशिक परिवहन विभाग व वाहतूक नियंत्रण शाखेने शहरातून होणाऱ्या कोळसा व इतर खनिजाच्या वाहतुकीदरम्यान अवजड वाहनांवर ताडपत्रीचे पुरेसे आच्छादन नसल्यास अशा वाहनांवर योग्य ती दंडात्मक कारवाई करावीवेको.लि.द्वारे त्यांच्या खाणीमधून कोळसा वाहतूक करताना पुरेसे ताडपत्रीचे आच्छादन व टायर वॉशिंग सिस्टीम बसविणे व कार्यरत करणे आवश्यक आहेचंद्रपूर शहर महानगरपालिकेने घनकचऱ्याची योग्य ती विल्हेवाट करणे व घनकचरा अवैधरीत्या जाळत असल्याचे आढळल्यास संबंधितांवर दंडात्मक कारवाई करावीअशा सुचना दिल्या.

००००००

No comments:

Post a Comment