Search This Blog

Monday, 24 November 2025

जिल्ह्यातील 33 केंद्रावर धान खरेदी सुरू

 जिल्ह्यातील 33 केंद्रावर धान खरेदी सुरू

चंद्रपूरदि. 24 : महाराष्ट्र राज्य सहकारी आदिवासी विकास महामंडळ नाशिकप्रादेशिक कार्यालय चंद्रपुर अंतर्गत शासनाच्या निर्देशनानुसार खरीप पणन हंगाम 2025-26 साठी नोव्हेंबरपासून धान खरेदी सुरू झाली आहेचिमूरनागभीडसिंदेवाहीवरोराभद्रावतीगोंडपिपरीराजुरा व पोंभुर्णा या तालुक्यातील एकूण 33 खरेदी केंद्रावर धान खरेदी करण्यात येत आहे.

      यात नवखळा,  मोहाडी मो., सावरगांवचिंधीचक,  बाळापूरकोजबीगिरगांवजिवनापूरगोविंदपूर , वाढोणातांबेगडीमेंढालाढबोरी,  मुरमाडीकळमगांव गन्नाशिवणीगडबोरी,  नाचनभट्टीपेठगांवचारगांव बु., वडधा तुभटाळाडोमाखांबाडाबोडधा,  आंबेनेरी,  अडेगाव देशमासाळटेकेपारमोटेगाव,  चंदनखेडापोंभुर्णा टिडीसीकरंजीचिंचोली  या केंद्रांचा समावेश आहे

खरीप  पणन हंगाम 2025-26 मध्ये ऑनलाईन नोंदणी व धान विक्रीसाठी शेतकऱ्यांनी त्यांच्या लगतच आ.वि.सहसंस्थाच्या खरेदी केंद्राशी संपर्क साधून ई-पिक पेरा केलेला सातबारानमूना आधारकार्ड ई – केवायसी केलेले बँक पासबुक,  संमतीपत्र व इतर आवश्यक दस्तावेज घेवून स्वतः हजर राहावे व ऑनलाईन नोंदणी करावीतसेच धान विक्री करून शासनाच्या आधारभूत किंमत खरेदी योजनेचा लाभ घ्यावाअसे प्रादेशिक व्यवस्थापक म.रासहआदिविकास महामंडळ यांनी कळविले आहे.

००००००

No comments:

Post a Comment