Search This Blog

Tuesday, 11 November 2025

38 वर्षांनंतर कृषी विभागाला मिळाले नवे बोधचिन्ह आणि घोषवाक्य


38 वर्षांनंतर कृषी विभागाला मिळाले नवे बोधचिन्ह आणि घोषवाक्य

Ø मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते  अनावरण

चंद्रपूरदि. 11 : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज सह्याद्री अतिथीगृहमुंबई येथे राज्य कृषी विभागाच्या नवीन बोधचिन्हाचे तसेच 'शाश्वत शेती समृद्ध शेतकरीया नवीन घोषवाक्याचे अनावरण केले. यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेअजित पवारकृषी मंत्री  दत्तात्रय भरणे, मंत्री सर्वश्री चंद्रशेखर बावनकुळेमाणिकराव कोकाटेहसन मुश्रीफगिरीश महाजनराज्यमंत्री ॲडआशिष जयस्वालमुख्य सचिव राजेश कुमारकृषि आयुक्त सुरज मांढरेउपसचिव प्रफुल्ल ठाकूरसंचालक रफिक नाईकवाडीकृषी विभागाचे अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होतेबोधचिन्ह स्पर्धेतील विजेता आणि घोषवाक्य स्पर्धेतील विजेत्यांचा यावेळी सत्कार करण्यात आला.

लोगोमधून शेतकऱ्यांची शक्तीतंत्रज्ञानआणि पर्यावरणपूरक विकासाचा संदेश : कृषी मंत्री

महाराष्ट्राची शेती ही परंपरेशी जोडलेली असूनही सतत नव्या दिशेने वाटचाल करणारी आहेकृषी विभागाचे हे नवे बोधचिन्ह म्हणजे केवळ प्रतीक नाहीतर महाराष्ट्राच्या शेतीचा आधुनिक चेहरा आहेया लोगोमधून शेतकऱ्यांची शक्तीतंत्रज्ञानआणि पर्यावरणपूरक विकासाचा संदेश दिला आहेहे बोधचिन्ह आणि घोषवाक्य राज्यातील प्रत्येक शेतकऱ्यांच्या प्रगतीचे प्रतीक बनेलहा बदल म्हणजे नव्या युगातील नव्या कृषी विचारांचा आरंभ आहेअशी प्रतिक्रिया कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिली.

कृषी विभागाचे विद्यमान बोधचिन्ह सुमारे 38 वर्षांपूर्वी तयार करण्यात आले होतेया कालावधीत शेतीत तंत्रज्ञानयांत्रिकीकरणनैसर्गिक शेतीहवामानबदल आणि उत्पादनाच्या नव्या दिशा अशा अनेक मूलभूत परिवर्तनांच्या पार्श्वभूमीवर विभागाची दृश्य आणि संवादात्मक ओळख अद्ययावत करण्याची गरज निर्माण झाली होतीया उद्देशाने कृषी विभागाने खुली स्पर्धा आयोजित केली होतीया स्पर्धेत जास्तीत जास्त प्रस्ताव प्राप्त व्हावे यासाठी कृषी विभागाच्या संकेतस्थळावर सार्वजनिक आवाहन (Call for Proposal) समावेशित करण्यात आलेकला महाविद्यालयातील आणि कृषी विद्यापीठातील विद्यार्थीप्राध्यापकसंशोधकअभ्यासककलाकारडिझायनर्सलेखकअधिकारीकर्मचारी आणि अन्य इच्छुक व्यक्तींना प्रस्ताव सादर करण्याचे आवाहन करण्यात आले होतेया स्पर्धेला अत्यंत उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला ज्यात एकूण 761 बोधचिन्ह प्रस्ताव आणि 949 घोषवाक्य प्रस्ताव प्राप्त झाले.

श्रीभरणे पुढे म्हणालेप्राप्त प्रस्तावांचे परीक्षण करण्यासाठी कृषी आयुक्तांच्या मान्यतेने समिती गठित करण्यात आलीया समितीने प्रत्येक प्रस्तावाचा तपशीलवार अभ्यास करून उत्कृष्ट कल्पनांची निवड केलीअंतिम निवड समितीने शासनास प्रत्येकी तीन बोधचिन्ह आणि तीन घोषवाक्यांची शिफारस केलीज्यांपैकी एकाची अंतिम निवड शासनाने केली. 7 नोव्हेंबर 2025 ला या नव्या बोधचिन्ह आणि घोषवाक्याला कृषी विभागाकडून मान्यता देण्यात आली आणि आज याचं अनावरण करण्यात आलंबोधचिन्ह स्पर्धेतील विजेते विरेंद्र भाईदास पाटील (क्रेझी क्रिएशन्सभुसावळआणि घोषवाक्य स्पर्धेतील विजेत्या सिद्धी भारतराव देसाई (परभणीहे ठरले.

भविष्यातील वापर आणि अधिकार : या नव्या उपक्रमामुळे कृषी विभागाची दृश्य ओळख अधिक सशक्त होणार असूनयापुढे कृषी विभागाच्या सर्व अधिकृत उपक्रमांमध्ये हे नवे बोधचिन्ह आणि घोषवाक्य वापरले जाणार आहेहे चिन्ह आणि घोषवाक्य हे कृषी विभागाची मालमत्ता असूनत्याचा अनधिकृत वापर केल्यास संबंधितांवर दंडात्मक कारवाई करण्यात येईल.

०००००००

No comments:

Post a Comment