Search This Blog

Saturday, 1 November 2025

लोहारा येथील हॉटेल ताडोबा अतिथी इन येथे कुंटणखान्यावर धाड


 लोहारा येथील हॉटेल ताडोबा अतिथी इन येथे कुंटणखान्यावर धाड

Ø एका महिलेची सुटकास्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

चंद्रपूरदि. 01 : पेट्रोलिंग करीत असतांना मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारावर स्थानिक गुन्हे शाखेने लोहार येथील हॉटेल ताडोबा अतिथी इन येथे चालविण्यात येत असलेल्या कुंटणखान्यावर धाड टाकत एका महिलेची सुटका केली. तसेच आरोपीला अटक केली.

 31 ऑक्टोबर रोजी स्थानिक गुन्हे शाखेचे अधिकारी व कर्मचारी रामनगर पोलिस स्टेशनच्या हद्दीत पेट्रोलींग करीत होते. यावेळी त्यांना गुप्त माहिती मिळाली कीलकी नावाचा मुलगा हॉटेल ताडोबा अतिथी इनलोहारा येथे  स्वत:च्या आर्थिक फायद्याकरीता पिडीत महिलांना हॉटेलमध्ये बोलावून कुंटणखाना चालवित आहे. या गुप्त माहितीच्या आधारे हॉटेल ताडोबा अतिथी इन येथे छापा टाकला असताआरोपी लकी उर्फ लक्ष्मण रामसिंह शर्मा (वय 26)रा. अलवरराजस्थान हा हॉटेलमध्ये एका पिडीत महिलेकडून स्वत:च्या आर्थिक फायद्याकरिता वेश्या व्यवसाय करून उपजीविका करत असल्याचे निष्पन झाले. यावरून रामनगर पोलिस स्टेशन येथे कलम 3,4,5,7 अनैतिक मानवी व्यापार प्रतिबंध अधि अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सदरच कामगिरी पोलिस अधीक्षक मुम्मका सुदर्शनचंद्रपूरअपर पोलिस अधीक्षक ईश्वर कातकडे यांच्या मार्गदर्शनात पोलिस निरीक्षक अमोल काचोरेउपनिरीक्षक संतोष निंभोरकरसुनील गौरकरसहायक फौजदार धनराज कारकाडेपोलिस हवालदार सुरेंद्र महतोदीपक डोंगरेप्रफुल गारघटेसुमित बरडेशशांक बादमवार किशोर वाकाटेहिरालाल गुप्ताचालक मिलिंद टेकाममहिला पोलिस छाया निकोडे,अपर्णा मानकरउषा लेडांगे,  निराशा तितरे तसेच सामाजिक संघटनांचे प्रतिनिधी सरिता मालूरेखा भारसकडे

यांनी केली आहे. याद्वारे सर्व लॉजिंगहॉटेल व्यावसायिक यांना आवाहन करण्यात आले आहे कीकुंटणखाणे चालवू नयेतअन्याय कठोर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

0000000

No comments:

Post a Comment