Search This Blog

Tuesday, 4 November 2025

मिशन मोडवर दिव्यांगांचे ‘युडीआयडी’ कार्ड काढा



 मिशन मोडवर दिव्यांगांचे ‘युडीआयडी’ कार्ड काढा

Ø जिल्हाधिका-यांकडून दिव्यांग सक्षमीकरणाबाबत आढावा

चंद्रपूरदि04 जिल्ह्यात नोंदणीकृत दिव्यांगांची संख्या 8578 असून असून त्यांच्या सक्षमीकरणासाठी शासन प्रशासन अनेक उपक्रम राबवित आहेयात दिव्यांगांना ‘युडीआयडी’ कार्ड (स्वावलंबन कार्डवितरीत करणेयाचा समावेश आहेत्यामुळे मिशन मोडवर दिव्यांगांना ‘युडीआयडी’ कार्डचे वाटप करावेअशा सुचना जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सीयांनी दिल्या.

जिल्हाधिकारी कार्यालयात दिव्यांग सक्षमीकरणबाबत आढावा घेतांना ते बोलत होतेयावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी पुलकित सिंहजिल्हा पोलिस अधिक्षक मुम्मका सुदर्शनजिल्हा सक्षमीकरण अधिकारी धनंजय साळवेवैद्यकीय अधिकारी डॉबंडू रामटेकेदिव्यांग प्रतिनिधी निलेश पाझारे आदी उपस्थित होते.

मुख्यमंत्री समृध्द पंचायतराज अभियान’ उपक्रमांतर्गत दिव्यांगांचे ‘युडीआयडी’ कार्ड मोठ्या प्रमाणात काढण्याच्या सुचना राज्य शासनाने दिल्या आहेतअसे सांगून जिल्हाधिकारी श्रीगौडा म्हणालेयासाठी तालुकानिहाय विशेष शिबिरांचे आयोजन करावेसार्वजनिक बांधकाम विभागाने दिव्यांग पुनर्वसन केंद्राचे काम अतिशय दर्जेदार आणि गतीने करावेअत्याधुनिक उपकरणांची तेथे उपलब्धता असावीया केंद्राकरीता मनुष्यबळ आणि इतर साधनसामुग्री बाबत आताच नियोजन कराअशाही सूचना त्यांनी दिल्या.

सादरीकरण करतांना दिव्यांग सक्षमीकरण अधिकारी धनंजय साळवे यांनीजिल्ह्यात आतापर्यंत 2727 दिव्यांग बांधवांचे ‘युडीआयडी’ कार्ड काढण्यात आल्याचे सांगितलेयावेळी इंडियन रेडक्रॉस सोसायटीद्वारा संचालित दिव्यांग पुनर्वसन केंद्राच्या पदभरतीस मान्यता देणेया केंद्राचे तात्पुरत्या स्वरुपात कामकाज डीईआयसी येथे सुरू करणे, ‘युडीआयडी’ कार्ड मिळण्याच्या दृष्टीने नियोजनबध्द कार्यक्रम आखून त्याची प्रभावी अंमलबजावणी करणेदिव्यांग व्यक्तिसाठी दृष्टी पोर्टलचंद्रपूर जिल्ह्यातील सार्वजनिक ठिकाणेसंकेतस्थळेवाहतूक  इतर अनुषंगिक सोयीसुविधा दिव्यांगांसाठी सुगम्य करणे आदींचा आढावा घेण्यात आला.

००००००

No comments:

Post a Comment