Search This Blog

Thursday, 20 November 2025

दिव्यांगांना युडीआयडी ओळखपत्र देण्यासाठी तालुकानिहाय शिबिरांचे आयोजन


 दिव्यांगांना युडीआयडी ओळखपत्र देण्यासाठी तालुकानिहाय शिबिरांचे आयोजन

चंद्रपूरदि. 20 : दिव्यांग व्यक्ती हक्क अधिनियम 2016 नुसार दिव्यांगांचे एकुण 21 प्रकार आहेतकेंद्र शासनाच्या धर्तीवर दिव्यांगत्वासंदर्भातील सर्व लाभ मिळविण्यासाठी वैश्विक ओळखपत्र (Unique Disability Identity Card-UDID Card)  बंधनकारक करण्यात आले आहेवैश्विक ओळखपत्र असल्याशिवाय दिव्यांगांना कोणताही लाभ देता येणार नाहीत्यामुळे चंद्रपूर जिल्ह्यातील ज्या दिव्यांग लाभार्थ्यांकडे (युडीआयडीवैश्विक ओळखपत्र नाहीअशा लाभार्थ्यासाठी जिल्हास्तरावर जिल्हा शल्य चिकित्सकजिल्हा सामान्य रुग्णालयचंद्रपूर येथे शिबिराचे आयोजन करण्यात आले असून तालुकानिहाय सुध्दा शिबीर घेण्यात येणार आहे

असे आहे तालुकानिहाय वेळापत्रक : पंचायत समिती कोरपना / जिवती येथे 3 डिसेंबर रोजीपंचायत समिती ब्रम्हपुरी /चिमुर येथे 4 डिसेंबर रोजीपंचायत समिती मुल /पोभुर्णा येथे 10 डिसेंबर रोजीपंचायत समिती भद्रावतीगोंडपिपरीराजुरा येथे 11 डिसेंबर रोजीपंचायत समिती सिंदेवाही / नागभिड येथे 17 डिसेंबर रोजी आणि पंचायत समिती सावली येथे 18 डिसेंबर 2025 रोजी शिबिरांचे आयोजन करण्यात आले आहे.

याशिवाय सर्व तालुक्यातील शिल्लक दिव्यांग लाभार्थ्यांकरीता 24 डिसेंबर, 26 डिसेंबर आणि 31 डिसेंबर 2025 रोजी शिबीर प्रस्तावित आहेवरील वेळापत्रकाप्रमाणे शिबीर घेऊन दिव्यांगत्वाचे प्रमाणपत्र/वैश्विक ओळखपत्र (युडीआयडीबाबत शासनाचे दिनांक 25 जुन 2018 नुसार नगरपालिकानगरपंचायतपंचायत समितीग्रामपंचायत च्या टक्के निधीतुन दिव्यांग लाभार्थ्याना ने-आण करण्याची जबाबदारी राहीलसदर शिबिरापासून कोणताही लाभार्थी वंचित राहु नयेयाबाबत दक्षता घेण्यात यावीअसे जिल्हा दिव्यांग सक्षमीकरण अधिकारी धंनजय साळवे यांनी कळविले आहे.

०००००००

No comments:

Post a Comment