अपर जिल्हाधिका-यांकडून जिल्हा ग्राहक संरक्षण परिषदेचा आढावा
चंद्रपूर, दि. 11 : जिल्हा ग्राहक संरक्षण परिषदेचा आढावा अपर जिल्हाधिकारी डॉ. नितीन व्यवहारे यांच्या अध्यक्षतेखाली आज (दि. 11) घेण्यात आला. जिल्हाधिकारी कार्यालयात पार पडलेल्या या बैठकीला पुरवठा विभागाचे राहुल वानखेडे, जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी शंकर तोटावार, राज्य कृषी मुल्य आयोगाचे सदस्य बंडू गौरकर यांच्यासह अशासकीय सदस्य परशुराम कोंडूलवार, नंदिनी सोनारकर, संगिता बैद, श्री. मेहरकुरे, इरशाद हुसैन, प्रणय कांबळे आदी उपस्थित होते.
यावेळी अपर जिल्हाधिकारी डॉ. व्यवहारे म्हणाले, आपण सर्वजण एक ग्राहकच आहोत. ग्राहकांच्या निगडीत असलेले विषय दुर्लक्षित करू नये. संबंधित यंत्रणांनी ग्राहकांचे हित जोपासावे. ग्राहकांनी काही बाबी निदर्शनास आणून दिल्यास त्यावर योग्य कारवाई करावी.
याप्रसंगी ग्राहक संरक्षण परिषदेची बैठक नियमित घेण्यात यावी. पेट्रोल पंपावर ग्राहकांसाठी मुलभूत सोयीसुविधा असाव्यात, त्याची प्रशासनाच्या वतीने तपासणी व्हावी, मुख्य रस्त्यावर उभ्या राहणा-या ट्रॅव्हल्सला निर्बंध करावे, 24 डिसेंबर रोजी राष्ट्रीय ग्राहक दिन मोठ्या प्रमाणात साजरा करावा. ग्राहकांचे हक्क आणि अधिकारी याबाबत महाविद्यालयांमध्ये जनजागृती करावी. शहरात अवैध पार्किंगला आळा घालावा. याबाबत पोलिस, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी यांनी संयुक्त कारवाई करावी. खाजगी रुग्णालयांनी त्यांचे दरपत्रक दर्शनी भागात लावावे, पैशांची ऑनलाईन फसवणूक प्रकरणी सायबर विभागाने त्वरीत कारवाई करावी, आदी विषयांवर चर्चा करण्यात आली.
०००००००
.jpeg)
.jpeg)
.jpeg)
No comments:
Post a Comment