Search This Blog

Monday, 17 November 2025

न्युमोनिया आजारापासून रक्षणासाठी विशेष जनजागृती मोहीम

 न्युमोनिया आजारापासून रक्षणासाठी विशेष जनजागृती मोहीम

चंद्रपूरदि. 17 : जिल्ह्यात 12 नोव्हेंबर 2025  ते 28 फेब्रुवारी 2026 या कालावधीत 5 वर्षाखालील बालकांना न्युमोनियापासून संरक्षण करण्यासाठी विशेष जनजागृती व तपासणी मोहीम राबविण्यात येत आहेजिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.अशोक कटारे यांच्या मार्गदर्शनात आशा कार्यकर्त्यामार्फत घरोघरी जावून बालकांची तपासणी केली जात आहे.

न्युमोनिया हा 5 वर्षाखालील बालकांचे मृत्यू होण्याचे प्रमुख कारण असल्याने लसीकरण व वेळेत उपचारावर विशेष भर देण्यात येत आहेलक्षणे दिसताच तातडीने नजीकच्या सरकारी आरोग्य केंद्रात तपासणी करून आवश्यक उपचार घ्यावेतसर्वात मोठा संसर्गजन्य विकार मानल्या जाणा-या न्यूमोनियाची गंभीरता लक्षात घेता दरवर्षी 12 नोव्हेंबर हा दिवस जागतिक न्युमोनिया दिन म्हणून साजरा होतोन्युमोनियात फुफ्फुसामध्ये संक्रमण होऊन कफ भरतोज्यामुळे शरीरातील ऑक्सिजन कमी होते आणि श्वासोच्छवास घेण्यास त्रास होतो.

या रोगाची मुख्य लक्षणे म्हणजे खोकलातापथंडी वाजणेछातीत दुखणेबालकाला वेळेत उपचार न केल्यास संभाव्य गुंतागुंत आणि मृत्यू होऊ शकतोजिल्हा आरोग्य अधिकारी यांच्या मार्गदर्शनात बालकांच्या घरघुती भेटीद्वारे लक्षणे ओळखून प्रतिबंधात्मक उपाययोजना राबविण्याचे आवाहन करण्यात आले आहेन्युमोनिया पासून संरक्षणासाठी बालकांचे लसीकरण वेळेत पूर्ण करणे आवश्यक आहे.

नवजात बालकांना पहिल्या सहा महिन्यापर्यंत मातेचे स्तनपान देणे, रोगप्रतिकारशक्ती वाढविणेमुलांच्या आसपास धुम्रपान टाळावेमुलांना पोषक आहारासह प्रदूषणमुक्त मोकळ्या जागेत खेळण्यास प्रोत्साहित करावेखोकला श्वासोच्छवासात अडचण आढळल्यास नजीकच्या सरकारी आरोग्य केंद्रात तपासणी करून औषधोपचार घ्यावे. न्यूमोनियाचा वाढता धोका लक्षात घेता बालकांचे संरक्षण करण्यासाठी आवश्यक काळजी घ्यावी आणि लसीकरणवैद्यकीय उपचार वेळेवर करावे, असे आवाहन आरोग्य विभागाने केले आहे.

००००००

No comments:

Post a Comment