जिल्हास्तरीय युवा महोत्सवाचे आयोजन
चंद्रपूर, दि. 10 : राष्ट्रीय एकात्मता वृध्दींगत होण्यासाठी व देशातील सर्व राज्यांची संस्कृती व परंपरा जतन करण्यासाठी केंद्रशासनामार्फत 1994 पासून दरवर्षी स्वामी विवेकानंदांच्या जयंती निमित्त 12 जानेवारी रोजी देशात राष्ट्रीय युवा महोत्सवाचे आयोजन करण्यात येते. यापूर्वी प्रत्येक राज्यात जिल्हा, विभाग व राज्यस्तरावर युवा महोत्सवाचे आयोजन करून राज्यातील युवांच्या सुप्त कलागुणांना वाव दिला जातो व त्याव्दारे उत्कृष्ट संघ /कलावंत यांना अनुक्रमे विभाग, राज्य व राष्ट्रीयस्तरीय युवा महोत्सवात आपले कला कौशल्य प्रदर्शित करण्याची संधी दिली जाते.
त्याअनुषंगाने चंद्रपूर जिल्ह्यातील 15 ते 29 वयोगटातील सर्व युवक व युवतींसाठी जिल्हास्तरीय युवा महोत्सव आयोजन समिती व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने 14 नोव्हेंबर 2025 रोजी वातानुकूलीत बॅडमिंटन हॉल, जिल्हा क्रीडा संकुल, चंद्रपूर येथे जिल्हास्तरीय युवा महोत्सवाचे आयोजन करण्यात येत आहे. या महोत्सवात वत्कृत्व स्पर्धा (हिंदी किंवा इंग्रजी) कथाकथन चित्रकला,लोकनृत्य लोकगित कविता लेखन (हिंदी, इंग्रजी किंवा प्रादेशिक भाषा) नवोपक्रम (विज्ञान प्रदर्शन) यांचा समावेश आहे.
अधिक माहितीसाठी संबंधित युवक व युवतींनी क्रीडा अधिकारी नंदू अवारे (मो.क्र. 9561226446), मोरेश्वर गायकवाड (मो. क्र 9423673232) यांच्याशी संपर्क साधावा. जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, चंद्रपूर येथे विहित नमुन्यातील अर्ज दि. 13 नोव्हेंबर 2025 पर्यंत कार्यालयीन वेळेत उपलब्ध आहे. अर्जासोबत पूर्ण नाव, पूर्ण पत्ता, मो. क्र., जन्मतारखेचा पुरावा, आधारकार्ड, 2 पासपोर्ट फोटो, बँक पासबुक झेरॉक्स, व कलाप्रकार यांचा समावेश करावा. सदर युवा महोत्सवामध्ये प्रथम, द्वितीय व तृतीय येणाऱ्या स्पर्धकांना रोख पारितोषिक देण्यात येणार आहे. तरी जिल्ह्यातील जास्तीत जास्त युवक व युवतींनी जिल्हास्तरीय युवा महोत्सवात सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी अविनाश पुंड यांनी केले आहे.
००००००

No comments:
Post a Comment