Search This Blog

Friday, 21 November 2025

तृतीयपंथीयांवरील हिंसाचारविरोधी जनजागृती कार्यक्रम

 


तृतीयपंथीयांवरील हिंसाचारविरोधी जनजागृती कार्यक्रम

चंद्रपूरदि. 21 : दिनांक 20 नोव्हेंबर हा दिवस "Transgender Day Of Remembrance"  जगभरात तृतीयपंथीय व्यक्तींवरील हिंसाचार विरुद्ध जनजागृती निमार्ण करण्यासाठी आणि हिंसेत मृत झालेल्या तृतीयपंथीय व्यक्तींना आदरांजली अर्पण करण्यासाठी पाळला जातो. त्याचे औचित्य साधुन सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग यांच्या अंतर्गत सहाय्यक आयुक्तसमाज कल्याणचंद्रपुर येथील सामाजिक न्याय भवन येथे  20 नोव्हेंबर 2025 रोजी तृतीयपंथीयांवरील हिंसाचारविरोधी जनजागृती कार्यक्रम आयोजित करण्यात आला.

कार्यक्रमात उपस्थित मान्यवरांनी हिंसामुक्त समाजासाठी जागरूकता व्याख्यानलिंग संवेदनशिलता विषयक माहितीतृतीयपंथीयाबाबतचे अधिकार याबाबत मार्गदर्शन केले. तसेच या कार्यक्रमामुळे तृतीयपंथीय समाजाला मानसिक व सामाजिक बळ मिळेल याबाबतचे सकारात्मक विचार मान्यवरांच्या हस्ते मांडण्यात आले.

अध्यक्ष म्हणुन सहाय्यक लेखाधिकारी दिपक धात्रक तसेच प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. संगिता पोतलेअंजु बालमवारविजेंद्र टेंभुर्णेनिधी चौधरीश्री. गिरडेप्रा. मनोज माकोडेसमाज कल्याण निरीक्षक स्मीता बहिरमवारश्वेता लक्कावार तसेच कार्यालयातील कर्मचारी अनिल बोडेसजल कांबळे,  संजय बन्सोडसंदीप वाढईगणेश खोटेसुरज डांगे व मोठ्या संख्येने विद्यार्थीबार्टी व क्रिस्टल कंपनीचे कर्मचारी व लाभार्थी उपस्थित होते.

0000000

No comments:

Post a Comment