21 नोहेंबर रोजी 'यूनिटी मार्च'
चंद्रपूर, दि. 20 : मेरा युवा भारत, युवा कार्यकम व खेळ मंत्रालय, जिल्हा प्रशासन, पोलिस प्रशासन, जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, राष्ट्रीय सेवा योजना, एन.सी.सी. यांच्या संयुक्त विद्यमाने भारताचे लोहपुरुष आणि राष्ट्रीय एकात्मतेचे शिल्पकार सरदार वल्लभभाई पटेल यांच्या 150 व्या जयंती निमित्त युनिटी मार्च पदयात्रेचे आयोजन करण्यात येत आहे. सदर पदयात्रा 21 नोव्हेंबर रोजी सकाळी 8 वाजता सरदार पटेल महाविद्यालय येथून सुरू होऊन श्रीराम चौक - संताजी सभागृह - पटेल हायस्कुल - गिरनार चौक - गांधी चौक - आंबेडकर पुतळा - जटपुरा गेट - कस्तुरबा रोड - गंजवार्ड - सरदार पटेल महाविद्यालय, चंद्रपुर येथे पदयात्रेचा समारोप होईल, असे मेरा युवा भारतचे जिल्हा युवा अधिकारी सुशील भड यांनी कळविले आहे.
००००००
No comments:
Post a Comment