Search This Blog

Wednesday, 12 November 2025

कार्यालयात अंतर्गत तक्रार समिती गठित करा अन्यथा दंड भरा


 

कार्यालयात अंतर्गत तक्रार समिती गठित करा अन्यथा दंड भरा

चंद्रपूरदि. 12 :  केंद्र शासनाच्या महिला व बाल विकास मंत्रालयाने कामाच्या ठिकाणी महिलांचे लैंगिक छळापासून संरक्षण (प्रतिबंधमनाई आणी निवारणअधिनियम, 2013 ची प्रभावी अंमलबजावणी करीता शी बॉक्स पोर्टल तयार केले आहे. त्यात महिलांना ऑनलाईन तक्रार नोंदविण्याचे सुविधेसोबत शासकीय व खाजगी आस्थापनांना अधिनियमांतर्गत स्थापन समितीची व इतर माहिती अपलोड करण्याची सुविधा देखिल उपलब्ध करून दिली आहे.

खाजगी आस्थापनाकार्यालयेकंपनीएमआय.डी.सीमॉलशैक्षणिक संस्था दुकानेबँकशासकीय संस्थाट्रस्टसोसायटीउत्पादकपुरवठावितरण व विक्रीकरमणुक क्रीडा संकुले, प्रेक्षागृहे, आरोग्य सेवा देणारे इत्यादी मध्ये 10 किंवा त्यापेक्षा अधिक कर्मचारी असल्यास अंतर्गत तक्रार समितीची स्थापना करून त्याप्रमाणे माहिती https://shebox.wcd.gov.in या वेबसाईटवरील होम स्क्रीनवर दाखविल्याप्रमाणे Private Head Office Registration मध्ये आवश्यक तपशील भरून नोंदणी करावीयाबाबत काही तांत्रिक अडचण असल्यास दूरध्वनी क्रमांक 011-23388074 यावर  किंवा ई मेल- tech support-shebox@gov.in येथे संपर्क करावा.

अधिनियमातील कलम 26 मधील तरतुदीचे पालन न केल्यास मालकास 50 हजार रुपयांपर्यंत दंड होईल. तसेच हाच प्रकार पुन्हा घडल्यास आस्थापनेचा परवाना रद्द व दुप्पट दंड अशी तरतुद आहेअसे जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी मिनाक्षी भस्मे यांनी कळविले आहे.

००००००

No comments:

Post a Comment