Search This Blog

Friday, 7 November 2025

आधारभुत दरानुसार मूंग उडीद व सोयाबीनची खरेदी 15 नोव्हेंबरपासून

 

आधारभुत दरानुसार मूंग उडीद व सोयाबीनची खरेदी 15 नोव्हेंबरपासून

Ø शेतकरी नोंदणीला सुरवात

चंद्रपूर, दि. 07 :महाराष्ट्र राज्य सहकारी पणन महासंघ व नाफेड यांच्या संयुक्त विद्यमानाने हंगाम २2025-26 मध्ये राज्यात केंद्र शासनाने निश्चित केलेल्या आधारभुत दरानुसार मूगउडीद व सोयाबीन खरेदीकरीता शेतकरी नोंदणी 30 ऑक्टोबर पासून सुरू झाली आहे. प्रत्यक्षात खरेदी प्रक्रिया 15 नोव्हेंबर 2025 पासुन सुरू करण्यात येणार आहेतसेच केंद्र शासनाने मुंगउडीद व सोयाबीन खरेदीकरीता आधारभुत दर निश्चित केले आहेतमुंग – 8768 रुपये प्रति क्विंटलउडीद – 7800 रुपये प्रति क्विंटल आणि सोयाबीन 5328 रुपये प्रति क्विंटल.

राज्य शासनाने नियुक्त केलेल्या दोन्ही केंद्रीय नोडल एजेन्सीना खरेदीकरीता जिल्ह्यांची  विभागणी करून दिली आहेयात नाफेडच्या वतीने अकोलाअमरावतीबीडबुलडाणाधाराशिवधुळेजळगावजालनाकोल्हापुरलातुरनंदुरबारपरभणीपुणेसांगलीसातारावर्धावाशिमसंभाजीनगरनांदेडयवतमाळभंडारा व गडचिरोली या जिल्ह्यात खरेदी सुरू करण्यात येईलतर  राज्य सहकारी पणन महासंघ (एन.सी.सी.एफच्या वतीने नाशिकनगरसोलापुरहिंगोलीचंद्रपुर व नागपुर या जिल्ह्यांमध्ये खरेदी सुरू होणार आहे.

केंद्र शासनाने निश्चित केलेल्या आधारभुत दरानुसार मुंगउडीद य सोयाबीन खरेदी योजनेचा शेतक-यांनी लाभ घ्यावासदरील योजना ही शेतकऱ्यांच्या शेतमालाला योग्य भाव मिळावा याकरीता राबविण्यात येत आहेत्यामुळे सर्व शेतकऱ्यांनी मुंगउडीद व सोयाबीन विक्रीकरीता आपल्या गावाजवळील नाफेड/एनसीसीएफ च्या नजिकच्या खरेदी केंद्रावर जावेसदर नोंदणी ही ऑनलाईन पध्दतीने पॉस मशिनद्वारे करण्यात येणार असल्यामुळे शेतकऱ्यांनी आधार कार्डबँक पासबुकचालु वर्षाचा 7/12 उतारापीकपेरा इकागदपत्रांसह नोंदणीकरीता प्रत्यक्ष खरेदी केंद्रावर उपस्थित राहणे अनिवार्य आहे.

तसेच खरेदीकरीता आपणास एसएमएस प्राप्त झाल्यानंतर शेतमाल विक्रीसाठी खरेदी केंद्रावर आणावा. जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन पणन महासंघाचे अध्यक्ष दत्तात्रय पानसरेउपाध्यक्ष रोहित निकमव्यवस्थापकीय संचालक श्रीधर डुबे-पाटील व संचालक मंडळ यांनी केले आहे.

०००००००

No comments:

Post a Comment