15 नोव्हेंबरपासून सोयाबीनची हमीभावाने खरेदी
चंद्रपूर, दि. 10 : हंगाम 2025-26 मध्ये शासनाने निश्चित केलेल्या आधारभुत दरानुसार नाफेड/NCCF मार्फत, कृषी उत्पन्न बाजार समिती, चंद्रपुर येथे सोयाबीन खरेदी करण्यात येणार आहे. सोयाबीन प्रतिक्विंटल 5328 रुपये असून शासनाने दिलेल्या निकषानुसार एफ.ए.क्यू. दर्जाचा शेतमाल खरेदी करण्यात येईल. सदर सोयाबीन खरेदीकरीता शेतक-यांची ऑनलाईन नोंदणी सुरू आहे व 15 नोव्हेंबर 2025पासून सोयाबीन खरेदी सुरू करण्यात येणार आहे. सोयाबीन खरेदीची ऑनलाईन नोंदणी शासनाच्या पोर्टलवर आधार प्रमाणीकरण करून बायोमेट्रिक पध्दतीने करण्यात आहे त्याकरीता शेतकऱ्यांना नोंदणी साठी स्वतः हजर राहणे आवश्यक आहे.
तरी तालुक्यातील सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांनी बाजार समिती खरेदी केंद्रावर आधार कार्ड, बँक पासबुक, 7/12 उतारा व मोबाईल क्रमांक या आवश्यक कागदपत्रांसह नोंदणी करून घ्यावी व शासकीय हमीभाव योजणेचा लाभ घ्यावा, असे आवाहन कृषी उत्पन्न बाजार समिती कडून करण्यात आले आहे.
००००००

No comments:
Post a Comment