Search This Blog

Wednesday, 12 November 2025

जिल्हाधिका-यांकडून बल्लारपूर येथील मतदान केंद्र व स्ट्राँग रुमची पाहणी




 जिल्हाधिका-यांकडून बल्लारपूर येथील मतदान केंद्र व स्ट्राँग रुमची पाहणी

Ø स्मार्ट पीएचसीला सुध्दा भेट

चंद्रपूरदि. 12 : नगर परिषद निवडणुकीच्या पार्श्वभुमीवर जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सीयांनी आज (दि12बल्लारपूर नगर परिषद क्षेत्रातील मतदान केंद्र आणि  स्ट्राँग रुमची पाहणी करून सूचना दिल्यायावेळी उपविभागीय अधिकारी अजय चरडेतहसीलदार रेणूका कोकाटे.मुख्याधिकारी विशाल वाघ आदी उपस्थित होते.

नगर परिषद बल्लारपूर निवडणूक संबंधाने जिल्हाधिका-यांनी मतदान केंद्र क्रमांक 1 ते 5/5 ची पाहणी केलीपाहणी दरम्यान सर्व मतदान केंद्रावर लाईटची व्यवस्था करण्याच्या सुचना दिल्यायावेळी त्यांनी स्ट्राँग रुममतमोजणी कक्ष तसेच बल्लारपूर तालुक्यात आगामी जिल्हा परिषद  पंचायत समिती निवडणूक संबंधाने मतदान केंद्राचीचीसुध्दा पाहणी केली.

विसापूर येथील पीएचसीला भेट : जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सीयांनी विसापूर येथील प्राथमिक आरोग्य केंद्राला भेट दिलीयावेळी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉअशोक कटारेतालुका वैद्यकीय अधिकारी आदी उपस्थित होतेस्मार्ट पीएचसी अंतर्गत हे काम त्वरीत पूर्ण करावेयासंदर्भात मुख्य कार्यकारी अधिकारीजिल्हा आरोग्य अधिकारीजि.कार्यकारी अभियंताउपअभियंता आणि संबंधित कंत्राटदार यांची बैठक आयोजित करण्याच्या सुचना दिल्या.

०००००००

No comments:

Post a Comment