Search This Blog

Sunday, 30 November 2025

घुग्घुस नगर परिषदेच्या निवडणुकीला स्थगिती


घुग्घुस नगर परिषदेच्या निवडणुकीला स्थगिती

गडचांदूरमूलबल्लारपूरवरोरा न.प. च्या काही सदस्य निवडणुकीला सुध्दा स्थगिती

चंद्रपूरदि. 30 : राज्य निवडणूक आयोगाच्या 4 नोव्हेंबर 2025 च्या पत्रान्वये चंद्रपूर जिल्ह्यातील बल्लारपूरभद्रावतीवरोराब्रम्हपुरीमूलघुग्घुसगडचांदूरचिमूरराजूरानागभीड या नगर परिषदांच्या व भिसी नगर पंचायतीच्या सदस्य व अध्यक्ष पदासाठी सार्वत्रिक निवडणूक कार्यक्रम जाहीर केला होता.

परंतु ज्या नगर परिषदा आणि नगर पंचायतीमध्ये ज्या जागेसाठी अपील दाखल होतेमात्र अपिलाचा निकाल संबंधित जिल्हा न्यायालयाकडून 22 नोव्हेंबर 2025 नंतर म्हणजेच 23 नोव्हेंबर 2025 किंवा त्यानंतर देण्यात आला आहेअशा नगर परिषदा व नगर पंचायतीच्या सदस्य पदाच्या त्या जागेच्या निवडणुका 4 नोव्हेंबर 2025 रोजीच्या निवडणूक कार्यक्रमानुसार घेण्यात येऊ नयेत. तसेच अशा प्रकरणात अध्यक्ष पदाचा समावेश असल्यास त्या संपूर्ण नगर परिषदेची निवडणूक स्थगित करण्याबाबत राज्य निवडणूक आयोगाने 29 नोव्हेंबर 2025 रोजी आदेशान्वये निर्देशित केले आहे.

त्या अनुषंगाने घुग्गुस  नगर परिषदेचे अध्यक्षपद व सात सदस्य जागा तसेच गडचांदूर न.प. ची जागा क्र. 8 - ब (सर्वसाधारण महिला)मूल न.प.ची जागा क्र. 10 -  ब (सर्वसाधारण)बल्लारपूर न.प. ची जागा क्र. 9 – अ (ना.मा. प्र.) आणि वरोरा नगर परिषदेची जागा क्र. 7 – ब (सर्वसाधारण) या निवडणुका संदर्भात महाराष्ट्र नगरपालिका निवडणूक नियम 1966 च्या नियम 17 (1)(ब) नुसार कार्यवाही न झाल्याने घुगुस नगर परिषदेचा संपूर्ण निवडणूक कार्यक्रम तसेच गडचांदूर न.प. ची जागा क्र. 8 - ब (सर्वसाधारण महिला)मूल न.प.ची जागा क्र. 10 -  ब (सर्वसाधारण)बल्लारपूर न.प. ची जागा क्र. 9 – अ (ना.मा. प्र.) आणि वरोरा नगर परिषदेची जागा क्र. 7 – ब (सर्वसाधारण) या जागेकरीता सदस्य पदाच्या निवडणुकीचा कार्यक्रमाला सुध्दा स्थगिती देण्यात आली आहे. त्यामुळे राज्य निवडणूक आयोगाने 29 नोव्हेंबर 2025 रोजीच्या आदेशानुसार घुग्घुस नगर परिषदेचा तर गडचांदूरमूलबल्लारपूर आणि वरोरा येथील वरील नमुद सदस्य निवडणुकीचा सुधारीत कार्यक्रम जाहीर केला असल्याचे जिल्हा निवडणूक कार्यालयाने कळविले आहे.

००००००

No comments:

Post a Comment