अल्पसंख्याक शाळांमधील पायाभूत सुविधांसाठी प्रस्ताव सादर करा
Ø अंतिम मुदत 14 नोव्हेंबर 2025 पर्यंत
चंद्रपूर. दि, 06 : राज्यातील धार्मिक अल्पसंख्यांक विद्यार्थी बहुल शासनमान्य खाजगी शाळा, कनिष्ठ महाविद्यालय, औद्योगिक प्रशिक्षण संस्था व अपंग शाळांमध्ये पायाभूत सुविधा पुरविण्यासाठी अनुदान योजना कार्यान्वित करण्यात आली आहे. तसेच 7 ऑक्टोबर 2024 च्या शासन निर्णय अन्वये सदर योजनेअंतर्गत धार्मिक अल्पसंख्याक दर्जा शैक्षणिक संस्थांना पायाभूत सोयीसुविधेसाठी देण्यात येणाऱ्या अनुदानाची मर्यादा 2 लक्ष रुपयांवरून वाढवून 10 लक्ष रुपये करण्यात आली आहे. त्यामुळे सदर योजनेकरीता 14 नोव्हेंबर 2025 पर्यंत अर्ज सादर करावे, असे प्रभारी जिल्हा नियोजन अधिकारी सुभाष कुमरे यांनी कळविले आहे.
अल्पसंख्याक बहुल शासनमान्य खाजगी शाळा, कनिष्ठ महाविद्यालय, औद्योगिक प्रशिक्षण संस्था व अपंग शाळांमध्ये पायाभूत सुविधा पुरविण्यासाठी अनुदान योजना सन 2025-26 या वर्षासाठी राबविण्यात येणार आहे. सदर योजनेंतर्गत प्राप्त होणाऱ्या प्रस्तावांची जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली समिती मार्फत शासन निर्णयामध्ये विहित केलेल्या निकषांनुसार अटी व शर्तीनुसार तपासणी करून, पात्र शाळा तथा कनिष्ठ महाविद्यालयांची शासनास शिफारस करण्यासाठी (प्रस्ताव पाठविण्यासाठी) वेळापत्रकानुसार कार्यवाही करावी.
जिल्ह्यातील अल्पसंख्यांक इच्छुक शाळा व कनिष्ठ महाविद्यालये यांच्याकडून जिल्हाधिकारी कार्यालयाकडे प्रस्ताव सादर करण्याचा अंतिम दिनांक 14 नोव्हेंबर 2025 पर्यंत आहे, याची सर्वांनी नोंद घ्यावी. जिल्हाधिकारी कार्यालयाने शासनास प्रस्ताव सादर करण्याचा अंतिम दिनांक 15 डिसेंबर 2025 पर्यंत आहे. त्यानंतर प्राप्त होणारे प्रस्ताव विचारात घेतले जाणार नाहीत.
०००००००
No comments:
Post a Comment