Search This Blog

Thursday, 6 November 2025

आदिवासी उमेदवारांना स्पर्धा परिक्षा मार्गदर्शन

 

आदिवासी उमेदवारांना स्पर्धा परिक्षा मार्गदर्शन

Ø अर्ज करण्याची अंतिम मुदत 25 नोव्हेंबरपर्यंत

चंद्रपूरदि06 : महाराष्ट्र शासनाच्या वतीने अनुसूचित जमाती (एसटी.) प्रवर्गातील उमेदवारांसाठी स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन वर्ग डिसेंबर 2025 पासून सुरू होणार आहेतहे वर्ग आदिवासी उमेदवारांकरीता कौशल्य विकासरोजगार  उद्योजकता माहिती  मार्गदर्शन केंद्रपहिला माळाप्रशासकीय इमारत चंद्रपूर येथे आयोजित करण्यात आले आहेत.

सदर मार्गदर्शन डिसेंबर 2025 ते 15 मार्च 2026 या कालावधीत म्हणजेच असेलवर्ग-3  वर्ग-4 पदांसाठी होणाऱ्या स्पर्धात्मक परीक्षेची सविस्तर तयारी या वर्गाद्वारे करून घेण्यात येईलइच्छुक उमेदवारांनी  1 ते 25 नोव्हेंबर 2025 या कालावधीत आवश्यक कागदपत्रांच्या (आधार कार्डशैक्षणिक प्रमाणपत्रेजातीचे प्रमाणपत्र  बँक पासबुकछाया प्रतींसह नोंदणी फॉर्म सादर करावानोंद केलेल्या उमेदवारांची मुलाखत 26 नोव्हेंबर रोजी घेण्यात येईलतर निवड यादी 28 नोव्हेंबर  रोजी प्रसिद्ध केली जाईल.

मार्गदर्शन वर्गामध्ये गणितइंग्रजीसामान्यज्ञानबुद्धीमता चाचणी आणि मराठी हे विषय अनुभवी मार्गदर्शकामार्फत शिकवले जातीलनिवड झालेल्या उमेदवारांना चार पुस्तकांचा संच तसेच प्रतिमाह एक हजार रुपये विद्यावेतन देण्यात येईल.

जिल्ह्यातील सर्व आदिवासी उमेदवारांनी या संधीचा लाभ घ्यावाअसे आवाहन कौशल्य विकासरोजगार  उद्योजकता मार्गदर्शन अधिकारी रोशन शंकर गभाले यांनी केले आहेअधिक माहितीसाठी मनोज सिडाम (मोक्र.9764580986) यांच्याशी अथवा कार्यालयाशी संपर्क साधावाअसे कळविण्यात आले आहे.

०००००००

No comments:

Post a Comment