जिल्हाधिका-यांकडून गोंडपिपरी तालुक्यात विकासकामांची पाहणी
चंद्रपूर, दि. 13 : जिल्हाधिकारी विनय
गौडा जी. सी. यांनी बुधवारी गोंडपिपरी तालुक्यातील विविध विकासकामांना
क्षेत्रीय भेट देत आढावा घेतला. या दौऱ्यात जिल्हाधिका-यांनी गोंडपिपरी
येथील नव्याने बांधकाम सुरू असलेल्या मुख्य प्रशासकीय इमारतीला भेट देऊन तेथील
कामांची पाहणी केली. इमारतीचे बांधकाम पुढील आठ दिवसांत पूर्ण करण्याच्या सुचना
त्यांनी कार्यकारी अभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग यांना दिल्या.
यानंतर मौजा भंगाराम तळोधी येथील स्मार्ट प्राथमिक आरोग्य
केंद्रास भेट दिली. या वेळी त्यांनी वैद्यकीय अधिकाऱ्यांशी संवाद साधून
रुग्णालयातील वॉर्ड, यंत्रसामग्री, औषधसाठा तसेच इतर आवश्यक सुविधांची माहिती घेतली आणि
आरोग्यसेवा अधिक सक्षम करण्याच्या सूचना दिल्या. तसेच मौजा वढोली
येथे स्थापन करण्यात आलेल्या 40 केडब्ल्यूपी सोलरायझेशनसह पाणीपुरवठा योजना स्थळाची पाहणी
करताना त्यांनी कामाची गुणवत्ता सुनिश्चित करण्याचे आदेश दिले.
या दरम्यान गोंडपिपरीच्या उपविभागीय अधिकारी लघिमा तिवारी, तहसीलदार शुभम बाहेकर, कार्यकारी
अभियंता मुकेश टांगले, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अशोक कटारे, कार्यकारी
अभियंता (जिल्हा
परिषद पाणीपुरवठा विभाग), गटविकास अधिकारी श्री. पुप्पलवार तसेच
नायब तहसीलदार चंद्रशेखर वेटे आदी अधिकारी उपस्थित होते.
००००००
.jpeg)
.jpeg)
.jpeg)
.jpeg)
No comments:
Post a Comment