Search This Blog

Friday, 21 November 2025

अवैध रेतीची वाहतूक करणारा हायवा जप्त भरारी पथकाची कारवाई

 अवैध रेतीची वाहतूक करणारा हायवा जप्त भरारी पथकाची कारवाई

चंद्रपूरदि. 21 :  जिल्हाधिकारी विनय गौडा यांच्या निर्देशानुसार जिल्हा भरारी पथक हे  20 नोव्हेंबर रोजी रात्री  10 च्या सुमारास गस्तीवर असतांना मौजा चिचपल्ली ते जुनोना मार्गावर अवैध रेतीची वाहतूक करीत असतांना एक ट्रक हायवा वाहन क्र. MH-२७ DT ८६७६ ची तपासणी करण्यात आली. वाहन चालक  अरशद मोहम्मद रा. अमरावती यांना वाहतूक परवानाबाबत विचारणा केली असता त्यांच्या जवळ वाहन परवाना आढळून आला नाही. त्यांनी वाहन परवाना दाखविला नाही. सदर वाहन हे अहेफाज भाई रा. अमरावती यांचे असल्याचे वाहन चालकाने सांगितले.

 वाहतूक परवाना नसल्यामुळे अवैध वाहतूक असल्याचे समजून सदर वाहन जप्त करुन पोलीस उपनिरीक्षक कवडू गेडाम यांच्या सुपूर्द नाम्यावर पोलीस चौकी चिचपल्ली येथे लावण्यात आले. पुढील कार्यवाही करण्याकरीता सदर वाहन तहसिलदार चंद्रपूर यांचेकडे सुपूर्द करुन पुढील कार्यवाही तहसिलदार चंद्रपूर यांचेकडून करण्यात येईलअसे प्रभारी जिल्हा खनिकर्म अधिकारी  रोहन ठवरे यांनी कळविले आहे.

0000000

No comments:

Post a Comment