Search This Blog

Monday, 24 November 2025

अखिल भारतीय वन क्रीडा स्पर्धेमध्ये चंद्रपूर वन अकादमी अव्वल


अखिल भारतीय वन क्रीडा स्पर्धेमध्ये चंद्रपूर वन अकादमी अव्वल

               चंद्रपूरदि. 24 :  देहराडून उत्तराखंड येथे संपन्न झालेल्या 28 व्या अखिल भारतीय वन क्रीडा स्पर्धा 2025 मध्ये महाराष्ट्र वनविभागाने उल्लेखनीय कामगिरी करत देशात था क्रमांक पटकावला आहेमहाराष्ट्राने एकूण 77 पदके यात 31 सुवर्ण, 26 रौप्य, 20 कांस्य पदके जिंकत 286 गुण मिळवले.         

या उत्कृष्ट कामगिरीत महाराष्ट्रातील सहा वनप्रशिक्षण अकादमीतील प्रशिक्षणार्थ्यांचा मोठा वाटा असून त्यांनी एकट्याने 27 पदके जिंकलीयात सुवर्ण, 10 रौप्य व कांस्य पदकांचा समावेश आहेधावण्याच्या विविध स्पर्धारिलेमेरेथॉनलॉग जंपरेस वॉकिंगजॅव्हलिन भोवेटलिफ्टिंगपॉवरलिफ्टिंग अशा विविध क्रीडा प्रकारांमध्ये त्यांनी उत्कृष्ट कामगिरी केलीयावरून राज्यातील वनप्रशिक्षण संस्थामधील प्रशिक्षणाची उच्च गुणवत्ता सिद्ध होते,

            चंद्रपूर वनअकादमीने सर्वाधिक 10 पदके जिंकत (6) सुवर्णआघाडी घेतलीअजय पठारे (100मीव 200मीदुहेरी सुवर्ण), जगदीश बरेला (लॉग जंपआणि साक्षी पवार (महिला 21 किमी रेसयांनी चमकदार कामगिरी करत चंद्रपूर वन  अकादमीला गौरव मिळवून दिलाशहापूर वन अकादमीने पदके (4सुवर्ण, 2 रौप्यजिंकत दुसरा क्रमांक मिळवलाअखिल जाधव 25 किमी मॅरेथॉन सुवर्णआणि हिमानी धनारे (वेटलिफ्टिंग आणि पॉवरलिफ्टिंग दोन्ही सुवर्णहे प्रमुख विजेते ठरलेचिखलदरा वन अकादमीने सातत्यपूर्ण कामगिरी करत पदके (3 रौप्य, 4 कांस्यपटकावलीयामध्ये सोमिका मंचेकरनेहा पिंगडे आणि संकेत मसाने यांनी मध्यम अंतर स्पर्धामध्ये चमक दाखवलीजालना अकादमीने रोहिणी पाटील यांच्या उत्कृष्ट धावण्याच्या कामगिरीच्या बळावर रौप्य पदकांचे योगदान दिले.

महाराष्ट्र वनविभागाच्या शिक्षण व प्रशिक्षण शाखेतर्फे सर्व क्रीडापटूप्रशिक्षक व प्रशिक्षण  अकामींचे मनःपूर्वक अभिनंदन करण्यात येत आहेत्यांची शिस्तटीमवर्क आणि समर्पण हीच खऱ्या अर्थाने वनसेवेची ओळख आहेअसे अपर प्रधान मुख्य वनसंरक्षक तथा वन अकादमीचे संचालक एमश्रीनिवास रेड्डी यांनी म्हटले आहे.

००००००

No comments:

Post a Comment