Search This Blog

Tuesday, 7 July 2020

कोरोना संसर्गाची साखळी खंडीत करणे गरजेची : ना. तनपुरे

कोरोना संसर्गाची साखळी
खंडीत करणे गरजेची : ना. तनपुरे
गडचांदूर नगर परिषदेत कोरोना विषयक आढावा बैठक
चंद्रपूर,दि.7 जुलै: कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर सर्वांनीच उत्तम काम केलेले आहे. पुढच्या काळामध्ये देखील असेच काम ठेवून कोरोना संसर्गाची साखळी खंडीत करणे गरजेचे आहे. तसेच  कोरोनाचा उद्रेक होणार नाही यासाठी नियोजन करावे. अशा सूचना राज्याचे नगर विकासऊर्जाउच्च व तंत्रशिक्षणआपत्ती व्यवस्थापनआदिवासी विकासमदत व पुनर्वसन राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी गडचांदूर येथे दिल्यात. काल ते चंद्रपूरच्या दौऱ्यावर होते. यावेळी त्यांनी गडचांदूर नगर परिषदेत कोरोना विषयक आढावा बैठक घेतली.
गडचांदूर नगर परिषदेच्या मुख्याधिकारी डॉ.विशाखा शेळके यांनी नगरपरिषद अंतर्गत आतापर्यंत कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी केलेल्या उपाययोजना विषयक सविस्तर माहिती सादर केली. तसेच घनकचरा व्यवस्थापन करणे व घनकचऱ्यासाठी जागा उपलब्ध करणेयाविषयीची मागणी देखील त्यांनी ना.प्राजक्त तनपुरे यांना केली.
दरम्यानराज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी बोलताना घरकुल योजना तसेच इतरही विकासात्मक योजना रखडू देऊ नयेघनकचऱ्यासाठी जागा उपलब्ध करण्यासंदर्भात योग्य ती कार्यवाही करावी,अशा सूचना केल्या.
आमदार सुभाष धोटे यांनी कोरपना तालुक्यात तसेच नगर परिषद अंतर्गत स्थापन केलेले कोविड केअर सेंटर सर्व सुविधा युक्त असावे, अशा सूचना तहसीलदार, नगरपरिषदेचे मुख्याधिकारी यांना यावेळी केल्या.
कोरपना तालुक्यात कोविड केअर सेंटरबाहेरून येणाऱ्या नागरिकांची आरोग्य तपासणी व नोंदणीआरोग्य संदर्भातील सर्वेक्षणकोरोना विषयक जनजागृती याविषयीची केलेली कार्यवाही तहसीलदार महेंद्र वाकलेकर यांनी विषद केली.
आरोग्य विभागाने बाधितांवर करण्यात येणारे उपचार तसेच उपाययोजनांची माहिती दिली. आरोग्य विभागाने आणखी सक्षमपणे आरोग्य सर्वेक्षण करून बाहेरून येणाऱ्या नागरिकांची नोंद करावी तसेच त्यांना अलगीकरणात ठेवण्याची सूचना ना.तनपुरे यांनी यावेळी आरोग्य विभागाला दिल्यात.
यावेळी राजूरा विधानसभा क्षेत्राचे आमदार सुभाष धोटेनगराध्यक्षा सविता टेकाम, नगर परीषदेचे उपाध्यक्ष शरद जोगी, उपविभागीय अधिकारी जे.पी लोंढेतहसीलदार महेंद्र वाकलेकर, नगर परिषदेच्या मुख्याधिकारी डॉ.विशाखा शेळकेराजेंद्र वैद्य तसेच नगरपरिषदआरोग्य विभागाचे सर्व अधिकारी , कर्मचारी प्रामुख्याने उपस्थित होते.
00000

No comments:

Post a Comment