Search This Blog

Friday, 5 June 2020

जिल्हाधिकारी कार्यालय येथे जागतिक पर्यावरण दिन साजरा

जिल्हाधिकारी कार्यालय येथे
जागतिक पर्यावरण दिन साजरा
Ø  जिल्हाधिकाऱ्यांनी केले वृक्षारोपण
Ø  कोरोना नियंत्रण कक्षांतर्गत सुद्धा जागतिक पर्यावरण दिन साजरा
चंद्रपूरदि 5 जून: जिल्हाधिकारी कार्यालय चंद्रपूर येथे जागतिक पर्यावरण दिन जिल्हाधिकारी डॉ.कुणाल खेमनार यांनी वृक्षारोपण करून हा दिवस साजरा करण्यात आला.दरवर्षी 5 जून हा दिवस जागतिक पर्यावरण दिन म्हणून पाळला जातो.
सर्व नागरिकांनी पर्यावरणाचे रक्षण व संरक्षण व्हावे यासाठी प्रयत्नशील असावे, असे मत सुद्धा जिल्हाधिकारी यांनी यावेळी व्यक्त केले.
सर्व जगभरात जागतिक पर्यावरण दिन वेगवेगळ्या पद्धतीने साजरा करण्यात येतो. या दिनाचा प्रमुख उद्देश म्हणजे पर्यावरण विषयक कार्यक्रम घेऊन पर्यावरण संरक्षण,संवर्धन  करणे हा आहे.
यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी संपत खलाटेउपजिल्हाधिकारी प्रियंका पवार-कर्डिलेजिल्हा  नाझर आशिष बाचनपल्लीवार तसेच अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
जिल्हा कोरोना नियंत्रण कक्षांतर्गत वृक्षारोपण:
आज जगभरात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव दिसून येतो.  जिल्ह्यात कोरोना विषाणूचा प्रसार होऊ नये व यावर नियंत्रण ठेवण्यासाठी जिल्हा कोरोना नियंत्रण कक्ष स्थापन केलेले आहे. आज या नियंत्रण कक्षांतर्गत जागतिक पर्यावरण दिनानिमित्त वृक्षारोपण करण्यात आले.
या वृक्षारोपण कार्यक्रमावेळी जिल्हा माता बाल संगोपन अधिकारी डॉ.संदीप गेडामजिल्हा सर्वेक्षण अधिकारी डॉ.सुधीर मेश्रामवैद्यकीय अधिकारी डॉ.प्रीती राजगोपालचारीतालुका आरोग्य अधिकारी डॉ.माधुरी मेश्रामसुनील चिकटे तसेच कोरोना नियंत्रण कक्षाचे अधिकारी व कर्मचारी प्रामुख्याने उपस्थित होते.
000000

No comments:

Post a Comment