चंद्रपूर बाधितांची संख्या 118 वर नव्या
5 बाधितांमध्ये चंद्रपूरमधील 4 गडचांदूर 1
आतापर्यत 57 कोरोनातून बरे
61 बाधितांवर उपचार सुरू
चंद्रपूर दि 4 जुलै : चंद्रपूर जिल्ह्यातील बाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत असून शनिवारी आणखी 5 बाधितांची यामध्ये भर पडली आहे. त्यामुळे जिल्ह्यातील आत्तापर्यंतच्या बाधितांची संख्या 118 झाली आहे. आत्तापर्यंत बरे झालेल्या बाधितांची संख्या 57 आहे. तर सध्या उपचार घेत असलेल्या बाधितांची संख्या 61 झाली आहे.
जिल्ह्यामध्ये बाहेरून येणाऱ्या नागरिकांमुळे ही संख्या वाढत आहे मात्र येणाऱ्यांनी आपली माहिती लपवू नये. आल्यानंतर आपल्या नावाची नोंद करावी शहरातील नागरिकांनी गरज नसेल तर बाहेर पडू नये मास्क बांधूनच बाहेर पडावे तसेच बाजारासह गर्दीच्या सर्व ठिकाणी अंतर ठेवून व्यवहार करावे असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे. येणाऱ्या काळामध्ये संपर्कातून बाधित वाढण्याची शक्यता आहे . मात्र आपल्यामुळे इतरांना त्रास होणार नाही याची काळजी घेऊन स्वतःबद्दलची माहिती प्रशासनाला देण्याबद्दल पुन्हा एकदा आवाहन करण्यात आले आहे.
जिल्ह्यातील सर्व कोविड केअर सेंटर सर्व आवश्यक सुविधांनी परिपूर्ण ठेवण्याचे निर्देश जिल्हाधिकारी डॉ. कुणाल खेमनार यांनी दिले आहे. जिल्ह्यात सध्या 16 कंटेनमेंट झोन सुरू आहेत. जिल्ह्यात सध्या 2217 नागरिक गृह अलगीकरणात आहे. तर संस्थात्मक अलगीकरणांमध्ये 448 नागरिक आहेत. जिल्ह्यातील ग्रामीण भागांमधून 91 तर चंद्रपूर महानगरपालिका क्षेत्रातून आतापर्यंत 27 नागरिक पॉझिटिव्ह निघाले आहे.
शुक्रवार पर्यंत जिल्ह्यातील कोरोना बाधितांची संख्या 113 होती. आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार शनिवारी दुपारी चंद्रपूर शहरातील रयतवारी कॉलनी परिसरातील एकाच कुटुंबातील एक 47 वर्षीय महिला व 19 वर्षीय युवतीचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. तेलंगाना राज्यातून हे दोन्ही कुटुंब सदस्य परत आले होते. 26 जून पासून गृह अलगीकरणात होते. काल घेण्यात आलेला त्यांचा स्वॅब आज पॉझिटिव्ह आला आहे.
ऊर्जानगर मधील काल पॉझिटिव्ह आलेल्या बाधित याच्या संपर्कातील 47 वर्षीय महिला देखील आज पॉझिटिव्ह म्हणून पुढे आली आहे. नाशिक येथून हे कुटुंब परत आले होते.
चंद्रपूर शहरातीलच हिंदुस्तान लालपेठ कॉलनी येथील 30 वर्षीय व्यक्तीचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. ठाणे शहरातून 24 जूनला ते चंद्रपूर मध्ये आले होते. तेव्हापासून संस्थात्मक अलगीकरणात होते. काल त्यांचा स्वॅब घेण्यात आला. तो पॉझिटिव्ह ठरला आहे. तर गडचांदूर येथील शिक्षक कॉलनीतील 48 वर्षीय व्यक्ती पॉझिटिव्ह ठरला आहे. आसाम राज्यातून 29 जून रोजी परतल्यानंतर सदर व्यक्ती गृह अलगीकरणात होता. त्यांचा काल स्वॅब घेण्यात आला. आज तो पॉझिटिव ठरला आहे. त्यामुळे जिल्ह्यातील एकूण पॉझिटीव्ह संख्या 118 झाली आहे.
जिल्हा आरोग्य यंत्रणेने दिलेल्या वृत्तानुसार चंद्रपूरमध्ये आतापर्यत २ मे ( एक बाधित ), १३ मे ( एक बाधित) २० मे ( एकूण १० बाधित ) २३ मे ( एकूण ७ बाधित ) व २४ मे ( एकूण बाधित २ ) २५ मे ( एक बाधित ) ३१ मे ( एक बाधित ) २ जून ( एक बाधित ) ४ जून ( दोन बाधित ) ५ जून ( एक बाधित ) ६ जून ( एक बाधित ) ७ जून ( एकूण ११ बाधित ) ९ जून ( एकूण ३ बाधित ) १० जून ( एक बाधित ) १३ जून ( एक बाधित ) १४ जून ( एकूण ३ बाधित ) १५ जून ( एक बाधित ) १६ जून ( एकूण ५ बाधित ) १७ जून ( एक बाधित ) १८ जून ( एक बाधित ) २१जून ( एक बाधित ) २२ जून ( एक बाधित ) २३ जून ( एकूण ४ बाधित ) २४ जून ( एक बाधित ) २५ जून ( एकूण १० बाधित ) २६ जून ( एकूण २ बाधित ) २७ जून ( एकूण ७ बाधित ) २८ जून ( एकूण ६ बाधित ) २९ जून ( एकूण ८ बाधित ) ३० जून ( एक बाधित ) १ जुलै ( २ बाधित ) २ जुलै ( २ बाधित ) आणि ३ जुलै ( ११ बाधित ) अशा प्रकारे जिल्हयातील कोरोना बाधित 118 झाले आहेत. आतापर्यत 57 बाधित बरे झाल्याने सुटी देण्यात आली आहे. त्यामुळे 118 पैकी रूग्णालयात उपचार घेणाऱ्या बाधितांची संख्या आता 61 झाली आहे. सर्व बाधितांची प्रकृती स्थिर असून त्यांच्यावर वैद्यकीय उपचार सुरू आहेत.
0000

No comments:
Post a Comment