24 जुलै रोजी प्लेसमेंट ड्राईव्हचे आयोजन
चंद्रपूर, दि. 22 : जिल्ह्यातील जास्तीत जास्त उमेदवारांना रोजगाराची संधी उपलब्ध व्हावी, उद्योजकांचा थेट नोकरी इच्छुक उमेदवारांशी संवाद व्हावा, या हेतूने जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, प्रशासकीय भवन, चंद्रपूर येथे 24 जुलै 2026 रोजी सकाळी 11 वाजता प्लेसमेंट ड्राईव्हचे आयोजन करण्यात आले आहे.
जिल्ह्यातील 10 वी, 12 वी, पदविका, पदवी इत्यादी युवक व युवतींकरीता विविध क्षेत्रात निर्माण होत असलेल्या रोजगारांच्या संधी उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने सदर कार्यक्रम घेण्यात येत आहे. जिल्ह्यातील जे.पी असोसिएट्स अॅड लांब्राराटेरियस चंद्रपूर, भारतीय बिमा निगममध्ये ॲडव्हायजर, सेल्स एक्ज्युकेटिव्ह, बीमा सखी, व्ही. आर. एंटरप्रायझेस येथे कंप्यूटर ऑपरेटर, सुपरव्हायझर, मशिन आपॅरेटर, ही पदे भरायची असल्याचे या कार्यालयास कळविण्यात आले आहे.
तरी प्लेसमेंट ड्राईव्हमध्ये उमेदवारांनी आधारकार्ड व शैक्षणिक अर्हता प्रमाणपत्राचे तसेच रिझ्यूमच्या प्रतीसह (कमीत कमी दोन प्रती) उपस्थित राहावे.
अधिक माहितीकरीता जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, चंद्रपूर दूरध्वनी क्रमांक 07172-252295 येथे संपर्क करावा, जिल्ह्यातील जास्तीत जास्त उमेदवारांनी सदर प्लेसमेंट ड्राईव्हमध्ये भाग घेण्याकरीता www.rojgar.mahaswayam.gov.in/
pminternship.mca.gov.in या वेबपोर्टलवर नोंदणी करावी, असे आवाहन सहायक आयुक्त, जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र यांनी केले आहे.
००००००

No comments:
Post a Comment