Search This Blog

Tuesday, 7 July 2026

10 जुलै रोजी प्लेसमेंट ड्राईव्हचे आयोजन

 

चंद्रपूर, दि. 7 : जिल्हातील 10 वी, 12 वी, पदविका, पदवी इत्यादी युवक व युवतींकरीता विविध क्षेत्रात निर्माण होत असलेल्या रोजगारांच्या संधी उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने तसेच जिल्हातील उद्योजकांचा थेट नोकरी इच्छुक उमेदवारांशी संपर्क करण्याच्या हेतूने जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, चंद्रपूरच्या वतीने 10 जुलै 2026 रोजी सकाळी 11 वाजता प्लेसमेंट ड्राईव्हचे आयोजन, जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, प्रशासकिय भवन चंद्रपूर येथे करण्यात आले आहे.

सदर प्लेसमेंट ड्राईव्हमध्ये 39 पेक्षा जास्त पदे भरण्यात येणार असून या प्लेसमेंट ड्राईव्हमध्ये 1. श्रीराम फायनान्स चंद्रपूर त्यामध्ये बिझनेस असोसिएट व अप्रेंटशीप, 2. क्राईस्ट हॉस्पिटल, चंद्रपूर त्यामध्ये मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेअंतर्गत स्टाफ नर्स व टेक्निशियन, 3. सुशीलाबाई रामचंद्रराव मामीडवार कॉलेज ऑफ सोशल वर्क, चंद्रपुर त्यामध्ये मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेअंतर्गत डेटा एंन्ट्री ऑपरेटर उमेदवार भरावयाची असल्याचे या कार्यालयास कळविण्यात आले आहे.

तरी मेळाव्याकरीता उमेदवारांनी आधारकार्ड व शैक्षणिक अर्हता प्रमाणपत्राचे तसेच रिझ्यूमच्या प्रतीसह (कमीत कमी दोन प्रती) उपस्थित राहावे. अधिक माहीतीकरीता जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, चंद्रपूर दूरध्वनी क्रमांक 07172-252295 येथे संपर्क करावा. जिल्हातील जास्तीत जास्त उमेदवारांनी सदर प्लेसमेंट ड्राईव्हमध्ये भाग घेण्याकरीता www.rojgar.mahaswayam.gov.in या वेबपोर्टलवर नोंदणी करण्याचे आवाहन सहायक आयुक्त यांनी केले आहे.

००००००


No comments:

Post a Comment