Search This Blog

Tuesday, 21 July 2026

अमृत बेकरी प्रशिक्षणासाठी अर्ज आमंत्रित

 अमृत बेकरी प्रशिक्षणासाठी अर्ज आमंत्रित

चंद्रपूर, दि. 21 : महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी (अमृत) पुणे व महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने अमृत बेकरी प्रशिक्षण कार्यक्रम 27 जुलै ते 02 सप्टेंबर 2026 या कालावधीत वरोरा येथे आयोजित करण्यात येणार असून प्रशिक्षणाचा कालावधी 30 दिवसांचा आहे.

अमृतच्या लक्षित गटातील ब्राम्हण, कोमटी, मारवाडी, गुजराती, सिंधी, कायस्थ, जाट, बनिया, बंसल, कम्मा, नायर, अय्यंगार, पाटीदार, बंगाली, पटेल, चेलमार, त्यागी, सेनगुन्थर, राजपुरोहित, नायडू, एलमार इत्यादी खुल्या प्रवर्गातील उमेदवारांसाठी हा प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.

प्रशिक्षणामध्ये बेकरी उद्योगातील तांत्रिक ज्ञान, ब्रेड, केक, बिस्किट, पेस्ट्री, कुकीज तसेच विविध बेकरी उत्पादनांची निर्मिती, अन्न सुरक्षा व स्वच्छता, गुणवत्ता नियंत्रण, पॅकेजिंग, उद्योगासाठी आवश्यक यंत्रसामग्रीची माहिती, उद्योग व्यवस्थापन, शासनाच्या विविध योजना, बँक कर्ज, बाजारपेठ सर्वेक्षण, प्रकल्प अहवाल तयार करणे, उद्योग भेट, यशस्वी उद्योजकांशी संवाद तसेच उद्योजकता विकास याबाबत तज्ज्ञांकडून मार्गदर्शन करण्यात येणार आहे.

प्रशिक्षणासाठी इच्छुक पात्र उमेदवारांनी  26 जुलै 2026 पर्यंत अर्ज सादर करावेत. प्रशिक्षणासाठी प्रवेश क्षमता 40 उमेदवारांची असून प्रवेश प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य या तत्त्वावर दिला जाणार आहे.

इच्छुक उमेदवारांनी आवश्यक कागदपत्रांसह महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र, उद्योग भवन २ रा माळा, बस स्टॅन्ड समोर, चंद्रपूर येथे अर्ज सादर करून या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन प्रकल्प अधिकारी संदीप जाने यांनी केले आहे.

000000000

No comments:

Post a Comment