महिला सक्षमीकरणामध्ये पद्म पुरस्काराकरीता नामांकन सादर करण्याचे आवाहन
चंद्रपूर, दि. 21 : पद्मविभुषण, पद्मभूषण आणि पद्मश्री पुरस्कार पुरस्कार हे देशातील सर्वोच्च नागरी पुरस्कारांपैकी एक आहेत. गृह मंत्रालय, भारत सरकार यांच्याकडून प्रजासत्ताक दिनाच्या (2027) निमित्ताने जाहीर केल्या जाणाऱ्या पद्म पुरस्कारांसाठी राज्यातून नामांकने मागविण्यात येत आहे. या पुरस्कारांचा उद्देश विशेष कामगीरीची दखल घेणे हा असून कला, साहित्य व शिक्षण, क्रिडा, वैद्यकीय क्षेत्र, समाजकार्य विज्ञान व अभियांत्रिकी, नागरीसेवा, व्यापार व उद्योग इत्यादी सर्व क्षेत्रांमधील/विषयांमधील उत्कृष्ट कामगीरीसाठी अथवा सेवेसाठी पद्म पुरस्कार पद्मविभुषण, पद्मभुषण आणि पद्मश्री पुरस्कार प्रदान केले जाते.
त्याअनुषंगाने भारत सरकार महिला व बाल विकास मंत्रालय यांनी महिला सक्षमीकरणामध्ये यशस्वी कामगिरीची सर्वोच्च पायरी व योगदान दिले आहेत, त्या पात्र व्यक्तींनी पद्म पुरस्कार पद्मविभुषण, पद्मभुषण आणि पद्मश्री पुरस्कार करीता http://awards.gov.in या संकेतस्थळावर ऑनलाईन पध्दतीने 31 जुलै 2026 पर्यंत रितसर माहिती भरून आवेदन करावे. पुरस्काराची घोषणा 26 जानेवारी 2027 रोजी होईल.
अधिक माहितीसाठी जिल्हा महिला व बाल विकास कार्यालय, आकाशवाणीच्या मागे, चंद्रपूर येथे संपर्क करावा, असे जिल्हा महिला व बालविकास अधिकारी कार्यालयाने कळविले आहे.
000000000

No comments:
Post a Comment