Search This Blog

Monday, 20 July 2026

आदिवासी विकास विभागाच्या गट ड पदासाठी 28 जुलै रोजी परीक्षा


आदिवासी विकास विभागाच्या गट ड पदासाठी 28 जुलै रोजी परीक्षा

चंद्रपूर, दि. 20 : आदिवासी विकास विभागामार्फत 29 एप्रिल 2026 रोजी चौकीदार (गट-ड) या संवर्गाची 478 पदाकरिता जाहीरात प्रसिध्द करण्यात आली होती. या पदांसाठी 28 जुलै 2026 रोजी 2 शिफ्टमध्ये परीक्षा घेण्यात येणार आहे.

सर्वसाधारण शिफ्ट 2 करीता  रिर्पोटिंग वेळ दुपारी 1 वाजता असून परीक्षा केंद्राचे प्रवेशद्वार 2.30 वाजता बंद करण्यात येईल. परीक्षा दुपारी 3 ते 5 या वेळेत घेण्यात येणार आहे. तर दिव्यांग उमेदवारांसाठी परिक्षोची वेळ दुपारी 3 5.40 वाजेपर्यंत राहील. उमेदवारांना त्यांचे प्रवेशपत्र परीक्षेच्या 7 दिवस अगोदर उपलब्ध होईल. तसेच परिक्षेचे ठिकाण, परिक्षेच्या सर्वसाधारण सुचना याबाबतची सर्व माहिती विभागाचे संकेतस्थळ https://tribal.maharashtra.gov.in यावर https://tdcwatchman२०२६.cbtexam.in या लिंकवर उपलब्ध करून दिली जाईल.

सदर लिंक वर उमेदवारानी त्यांचे प्रवेशपत्र व परिक्षेच्या मार्गदर्शक सुचना डाऊनलोड कराव्यात, असे आवाहन प्रकल्प अधिकारी विकास राचेलवार यांनी केले आहे.

०००००००

No comments:

Post a Comment