Ø पात्र लाभार्थ्यांनी योजनांचा लाभ घेण्याचे आवाहन
चंद्रपूर, दि. 7
: इतर मागासवर्गीय समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी कार्यरत असलेल्या
महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळ तसेच त्याअंतर्गत
कार्यरत 13 उपकंपन्यांची स्थापना शासनाने केली असून महामंडळाचे
जिल्हा स्तरावर चंद्रपूर येथे कामकाज सुरु करण्यात आले आहे.
महामंडळाच्या
विविध योजनांचा लाभ घेण्यासाठी पात्र लाभार्थ्यांनी ऑनलाईन नोंदणी करावी. महामंडळामार्फत
सहा योजना राबविल्या जात असून त्यामध्ये 20 टक्के बीज भांडवल योजना, थेट कर्ज योजना (1 लक्ष रुपयांपर्यंत) वैयक्तिक कर्ज व्याज परतावा योजना,
गट कर्ज व्याज परतावा योजना, शैक्षणिक कर्ज
व्याज परतावा योजना, महिला स्वयंसिद्धी व्याज परतावा योजना.
या योजना पूर्णत: ऑनलाईन स्वरूपाच्या आहेत. या योजनांसाठी पात्र अर्जदारांनी
आवश्यक कागदपत्रांसह www.msobcfdc.org या वेब पोर्टलवर अर्ज
करणे अनिवार्य आहे.
अधिक
माहितीसाठी महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळ, डॉ.
बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, चंद्रपुर दूरध्वनी
क्र. 07172-262420 या ठिकाणी संपर्क साधावा, असे आवाहन
महामंडळाचे जिल्हा व्यवस्थापक के. के. सातपुते यांनी केले आहे.
संलग्न
असलेले इतर महामंडळ : लेवा पाटीदार समाज आर्थिक विकास महामंडळ, सोळा
कुलस्वामिनी आर्थिक विकास महामंडळ (लाडशाखीय वाणी/ वाणी समाज), स्व. विष्णुपंत रामचंद्र दादरे (लोणारी) आर्थिक विकास महामंडळ (लोणारी
समाज), श्री संत नामदेव महाराज शिंपी समाज आर्थिक विकास
महामंडळ (शिंपी समाज), संत भोजलिंग काका सुतार समाज आर्थिक
विकास महामंडळ (सुतार समाज), सरदार वल्लभभाई पटेल गुजर समाज
आर्थिक विकास महामंडळ, संत नरहरी महाराज आर्थिक विकास
महामंडळ (सोनार समाज), संत श्री संताजी महाराज आर्थिक विकास
महामंडळ (तेली समाज), संत श्री रुपलाल महाराज आर्थिक विकास
महामंडळ (बारी समाज), आगरी समाज आर्थिक विकास महामंडळ,
जगज्योती महात्मा बसवेश्वर आर्थिक विकास महामंडळ (लिंगायत समाज),
संत काशिबा गुरव युवा आर्थिक विकास महामंडळ (गुरव समाज), संत सेनाजी महाराज केशशिल्पी महामंडळ (नाभिक समाज).
००००००
No comments:
Post a Comment