मधमाशापालन योजनेच्या लाभासाठी अर्ज आमंत्रित
चंद्रपूर, दि. 21 : महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळामार्फत मध केंद्र योजना (मधमाशापालन) संपूर्ण राज्यात कार्यान्वीत झाली आहे. याकरीता पात्र व्यक्ती कडून/संस्थाकडून अर्ज मागविण्यात येत आहे.
योजनेची वैशिष्टे : मध उद्योगाचे मोफत प्रशिक्षण, साहित्य स्वरुपात 50 टक्के अनुदान व 50 टक्के स्वंगुतवणुक, शासनाच्या हमीभावाने मध खरेदी, विशेष छंद प्रशिक्षणाची सुविधा, मधमाशा संरक्षण व संर्वधनाची जनजागृती.
योजनेतील प्रमुख घटक आणि पात्रता
1. वैयक्तीक मधपाळ : पात्रता अर्जदार स्वाक्षर असावा, स्वत:ची शेती असल्यास प्राधान्य, वय 18 वर्षापेक्षा जास्त असावे
2. केंद्रचालक प्रगतशिल मधपाळ : व्यक्ती पात्रता किमान 10 वी पास, वय 21 वर्षापेक्षा जास्त असावे, व्यक्ती चे नावे किमान किंवा त्या व्यक्ती च्या कुंटूबातील कोणत्याही व्यक्तीच्या नावे किमान 1 एकर शेती/जमीन किंवा भाडे तत्वावर घेतलली शेत जमीन तसेच लाभार्थीकडे मधमाशापालन प्रजनन व मध उत्पादनाबाबतीत लोकाना प्रशिक्षण देण्याची क्षमता व सुविधा असावी.
3. केंद्र चालक संस्था पात्रता : संस्था नोंदणीकृत असावी. संस्थेचे नावे अथवा भाडेतत्वावर घेतलेली किमान 1 हजार चौ. फुट सुयोग्य ईमारत असावी. संस्थेकडे मधमाशापालन प्रजनन व मध उत्पादनाबाबतीत लोकांना प्रशिक्षण देण्याची क्षमता असलेली सेवा असावी
अटी व शर्ती : लाभार्थी निवड प्रक्रियेनंतर प्रशिक्षणापूर्वी मध व्यवसाय सुरू करण्यासंबंधी मंडळास बंद पत्र लिहून देणे अनिवार्य राहील, मंडळाने निश्चित केलेल्या ठिकाणी प्रशिक्षण घेणे अनिवार्य आहे.
अधिक माहिती करीता संपर्क : जिल्हा ग्रामोद्योग अधिकारी, महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडल, उद्योग भवन, दुसरा माळा, बस स्टॅन्ड समोर, चंद्रपूर. मोबाईल क्रमांक : 9373287057/9322789232 , मध संचालनालय, महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडल, शासकीय बंगला क्रं.7, महाबळेश्वर, जि. सातारा, पिन : 412806 दुरध्वनी : 02168 - 268264.
000000000
No comments:
Post a Comment