डीएलएड प्रवेश प्रक्रियेकरीता 8 ते 12 जुलै दरम्यान विशेष फेरी
चंद्रपूर, दि. 8 : डीएलएड प्रवेश प्रक्रिया सन 2026-27 च्या तीन प्रवेश फेऱ्या पूर्ण झालेल्या असून रिक्त जागेवरील प्रवेशाकरिता विशेष फेरी 8 ते 12 जुलै 2026 दरम्यान ऑनलाईन अर्ज भरण्याकरिता सुरू होत आहे. 12 उत्तीर्ण पात्र विद्यार्थ्यांनी पूर्वीप्रमाणेच www.maa.ac.in या संकेतस्थळावर जाऊन स्वतःचा अर्ज भरावा. अर्ज Approve झाल्यानंतर स्वतःच्या लॉगीन मधून प्रवेश निश्चित करावा.
यापूर्वी ज्या विद्यार्थ्यांनी प्रवेश अर्ज ऑनलाईन भरलेला आहे, परंतु प्रवेश घेतलेला नाही, अशा विद्यार्थ्यांना नव्याने प्रवेश शुल्क भरण्याची आवश्यकता नाही. अधिक माहितीकरिता www.maa.ac.in या संकेत स्थळावर भेट देण्यात यावी.
००००००
No comments:
Post a Comment