‘बेटी बचाओ, बेटी पढाओ’ व जिल्हास्तरीय संनियत्रण समितीची बैठक
चंद्रपूर, दि. 24 : जिल्हा महिला व बालविकास अधिकारी कार्यालय अंतर्गत ‘बेटी बचाओ, बेटी पढाओ’ व जिल्हास्तरीय संनियत्रण समितीची बैठक जिल्हाधिकारी वसुमना पंत यांच्या अध्यक्षतेखाली नुकतीच पार पडली. जिल्हाधिकारी कार्यालयात घेण्यात आलेल्य या बैठकीला मुख्य कार्यकारी अधिकारी पुलकित सिंह, मनपा आयुक्त अकुनुरी नरेश आदी उपस्थित होते.
यावेळी जिल्हा महिला व बालविकास अधिकारी कार्यालयाअंतर्गत स्वाधारगृह, शुभमंगल सामुहिक विवाह, महिला समुपदेशन केंद्र, कौटुंबिक हिंसाचार प्रतिबंध कायदा, सखी वन स्टॉप सेंटर, जिजामाता वर्किंग वुमन होस्टेल, शक्तीसदन स्वाधार महिला निवासगृह, महिला सक्षमीकरण केंद्र, कौटुंबिक सल्ला केंद्र याबाबत माहिती सादर करण्यात आली. 15 ऑगस्टपर्यंत सर्व आस्थपनांना ‘शी बॉक्स पोर्टलवर’ नोंद करणे, अंतर्गत तक्रार समिती स्थापन करणे, वार्ड/प्रभाग येथे बाल संरक्षण समिती गठीत याबाबत जिल्हाधिकारी यांनी सूचना दिल्या.
कार्यक्रमाला नगर प्रशासन सहआयुक्त डॉ. विद्या गायकवाड, जिल्हा महिला व बालविकास अधिकारी मिनाक्षी भस्मे, जिल्हा कार्यक्रम अधिकारी भागवत तांबे, बाल विकास प्रकल्प अधिकारी प्रकाश भांदककर, माविमचे जिल्हा व्यवस्थापक प्रदिप काठोळे, पोलिस निरीक्षक अमोल काचोरे, शासकीय मुलांचे निरीक्षण गृहाचे अधिक्षक हेमंत सवाई, , संरक्षण अधिकारी कविता राठोड, परिविक्षा अधिकारी अतिशकुमार चव्हाण, अभिषेक मोहुर्ले यांच्यासह चाईल्ड लाईन अधिकारी/कर्मचारी उपस्थित होते.
००००००

No comments:
Post a Comment