प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कारासाठी अर्ज आमंत्रित
चंद्रपूर, दि. 21 : केंद्र शासनाच्या महिला व बाल विकास विभागामार्फत राष्ट्रीय बाल पुरस्कार दिला जातो. ज्या मुलांनी (वय 5 वर्षांपेक्षा अधिक व 18 वर्षांपर्यंतच्या), शिक्षण, कला, सांस्कृतिक कार्य, खेळ, नाविन्यपुर्ण शोध, समाजिक कार्य व शौर्य अशा क्षेत्रात विशेष नाविन्यपुर्ण कामगिरी केली आहे, त्यांना हा पुरस्कार दिला जातो.
प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कार 2026 करीता केंद्र शासनाने अर्ज मागविले आहेत. सदरचे अर्ज http://awards.gov.in या संकेतस्थळामार्फत ऑनलाईन पध्दतीने स्वीकारले जाणार आहेत. ज्या मुलांचे वय 5 पेक्षा अधिक व 31 जुलै 2026 रोजी 18 वर्षांपेक्षा कमी आहे व ज्या मुलांनी शिक्षण, कला, सांस्कृतीक कार्य, खेळ, नाविन्यपुर्ण शोध, सामाजिक कार्य व शौर्य अशा क्षेत्रात विशेष कामगिरी केली आहे, त्यांचे प्रस्ताव वरील संकेतस्थळावर स्वतः मुले किंवा त्यांच्या वतीने राज्य सरकार, केंद्रशासित प्रदेश, जिल्हाधिकारी/ जिल्हादंडाधिकारी, पंचायत राज्य संस्था, नागरी स्वराज संस्था, शैक्षणिक संस्था इ. अर्ज करू शकतात.
ऑनलाईन अर्ज स्वीकारणे सुरू झाले असून सदर संकेतस्थळावर पात्र उमेदवारांनी अर्ज करावे. अधिक माहितीसाठी जिल्हा महिला व बाल विकास कार्यालय, आकाशवाणीचा मागे, चंद्रपुर कार्यलयाला संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी मिनाक्षी भस्मे यांनी केले आहे.
000000000

No comments:
Post a Comment