ॲथलेटीक्स प्रशिक्षणासाठी खेळाडू निवड चाचणीचे आयोजन
चंद्रपूर, दि. 22 : केंद्र शासनाच्या खेलो इंडिया उपक्रमांतर्गत जिल्हा क्रीडा संकुल चंद्रपूर येथे जिल्हास्तरीय मैदानी खेलो इंडिया अनिवासी प्रशिक्षण केंद्राकरिता खेळाडू निवड चाचणीचे आयोजन 30 जुलै 2026 ला करण्यात आले आहे.
14 वर्षे आतील मुले /मुलींनी 30 जुलै रोजी सकाळी 9 वाजता उपस्थित राहावे. सदर खेळाडूचा जन्म 30 जुलै 2013 ते 30 जुलै 2015 दरम्यानचा असावा. उंचीला प्राधान्य देण्यात येईल. सर्व खेळाडूंनी स्वतःच्या तयारीने यावे. प्रशिक्षण केंद्र हे अनिवासी आहे. आधारकार्ड व जन्मदाखला प्रत सोबत आणावे. खेळाडूंनी पासपोर्ट साईज २ फोटो सोबत आणावे.
उपरोक्त निवड चाचणीकरिता चंद्रपूर जिल्ह्यातील व महानगरपालिका शाळेतील जास्तीत जास्त खेळाडूंनी आपली नावे जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, चंद्रपूर येथे कार्यालयीन वेळेत नोंदणी करून चाचणीच्या दिवशी उपस्थित ठेवावे. अधिक माहितीकरिता क्रीडा अधिकारी मोरेश्वर गायकवाड, खेलो इंडिया मैदानी प्रशिक्षक रोशन भूजाडे यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी अविनाश पुंड यांनी केले आहे.
००००००

No comments:
Post a Comment