Search This Blog

Wednesday, 15 July 2026

आदिवासी उमेदवारांना स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन

 

आदिवासी उमेदवारांना स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन

Ø 29 जुलै पूर्वी सादर करण्याचे आवाहन

चंद्रपूर, दि.15: महाराष्ट्र शासनाच्या वतीने अनुसूचित जमाती (एस. टी.) प्रवर्गातील उमेदवारांसाठी स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन वर्ग 03 ऑगष्ट, 2026 पासून सुरू होणार आहेत. हे वर्ग आदिवासी उमेदवारांकरीता कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता माहिती व मार्गदर्शन केंद्र, पहिला मजला, हॉल क्रमांक 19, जिल्हा माहिती कार्यालयासमोर, चंद्रपूर येथे आयोजित करण्यात आले आहेत.

सदर मार्गदर्शन 03 ऑगष्ट, 2026 ते 15 नोव्हेंबर, 2026 या कालावधीत म्हणजेच सुमारे साडेतीन  महिन्यांचे असेल, वर्ग-3 व वर्ग-4 पदांसाठी होणाऱ्या  स्पर्धात्मक परीक्षेची सविस्तर तयारी या वर्गाद्वारे करून घेण्यात येईल. इच्छुक उमेदवारांनी 29 जुलै, 2026 पूर्वी आवश्यक कागदपत्रांच्या (आधार कार्ड, शैक्षणिक प्रमाणपत्रे, जातीचे प्रमाणपत्र व बैंक पासबुक) छायाप्रतीसह नोंदणी फॉर्म सादर करावा, नोंद केलेल्या उमेदवारांची मुलाखत 30 जुलै, 2026 रोजी घेण्यात येईल, तर निवड यादी 31 जुलै, 2026 रोजी प्रसिध्द केली जाईल.

मार्गदर्शन वर्गामध्ये गणित, इंग्रजी, सामान्यज्ञान, बुद्धीमता चाचणी आणि मराठी हे विषय अनुभवी मार्गदर्शकांमार्फत शिकवले जातील. निवड झालेल्या उमेदवारांना चार पुस्तकाचे संच तसेच प्रतीमाह 1 हजार रुपये विद्यावेतन देण्यात येईल.

जिल्ह्यातील सर्व आदिवासी उमेदवारांनी या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन अधिकारी, रोशन गभाले यांनी केले आहे. अधिक माहितीसाठी श्री. मनोज सिडाम (मो. क्र. ९७६४५८०९८६) यांच्याशी अथवा कार्यालयासी संपर्क साधावा.

000000

No comments:

Post a Comment