20 जुलै रोजी जिल्हास्तरीय महिला लोकशाही दिन
चंद्रपूर, दि. 9 : समस्याग्रस्त व पीडित महिलांना त्यांचे प्रश्न मांडण्यासाठी व्यासपीठ मिळावे, तसेच महिलांच्या तक्रारी/अडचणी शासकीय यंत्रणेकडून सोडवणूक करण्यासाठी सुविधा उपलब्ध व्हावी, यासाठी एक प्रभावी उपाययोजना म्हणून महिला लोकशाही दिन राबविण्यात येतो.
ज्या महिलांच्या तक्रारी/निवेदन/अडचणी/ समस्या वैयक्तीक स्वरुपाच्या असतील, अशा तक्रारी महिला लोकशाही दिनाच्या 15 दिवसापूर्वी जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी, चंद्रपूर यांचे कार्यालयात दोन प्रतीत अर्ज सादर करावे. प्राप्त तक्रार अर्जाचा निपटारा करण्यासाठी संबंधित विभागाला पाठविण्यात येईल. प्रत्येक महिन्याच्या तिसऱ्या सोमवारी जिल्हा स्तरावर महिला लोकशाही दिन व चौथा सोमवार तालुकास्तरीय महिला लोकशाही दिन आयोजित करण्यात येतो.
जुलै 2026 महिन्याचा तिसरा सोमवार दि. 20 रोजी येत असल्याने महिला लोकशाही दिनाचे आयोजन दुपारी वेळ 1 वा. निवासी उपजिल्हाधिकारी, तथा अपर जिल्हादंडाधिकारी चंद्रपूर यांच्या दालनात करण्यात आले आहे. तरी समस्याग्रस्त पिडीत महिलांनी आपले प्रश्न सोडविण्यासाठी महिला लोकशाही दिनाचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी मिनाक्षी भस्मे यांनी केले आहे.
०००००००

No comments:
Post a Comment