बि.आर.टी.सी. बांबूवर आधारीत डिप्लोमा सुरू करणारी महाराष्ट्रातील प्रथम संस्था
चंद्रपूर दि.21 ऑगस्ट - चंद्रपूर जिल्हात वित्त, नियोजन व वनेमंत्री तथा चंद्रपूर जिल्हयाचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या संकल्पनेतून साकार झालेल्या बांबू संशोधन व प्रशिक्षण केंद्रातर्फे दोन वर्षाच्या कालावधीचा डिप्लोमा इन बांबू टेक्नोलॉजी, हा पदविका अभ्यासक्रम सुरु करण्यात येत आहे. महारष्ट्रातील अशाप्रकारचा अभ्यासक्रम सुरू करणारी ही पहिलीच संस्था असणार आहे.
सदरचा अभ्यासक्रम हा महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण मंडळाशी संलग्नीत असणार आहे. हा अभ्यासक्रम दोन वर्षाचा असून जास्तीत जास्त प्रात्याक्षिकावर भर देण्यात येणार आहे. या अभ्यासक्रमासाठी 20 विद्यार्थीक्षमता राहणार आहे, प्रवेश प्रक्रियेसाठी पात्रता 10 वी उत्तीर्ण किंवा महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण मंडळ, यांची मान्यता प्राप्त असलेल्या समकक्ष परीक्षा उत्तीर्ण गुणावर तसेच बांबूवर आधारीत कौशल्य चाचणी व अभियोग्यता चाचणी यांच्या गुणांवर आधारीत असेल, प्रवेश प्रक्रियेसाठी महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण मंडळाने ठरवून दिलेल्या प्रक्रियेचा अवलंब केला जाईल. विद्यार्थ्यासाठी प्रवेश अर्ज व प्रवेश पुस्तीका दिनांक 24 ऑगस्ट 2017 ते 04 सप्टेंबर 2017 या कालावधीमध्ये बांबू संशोधन व प्रशिक्षण केंद्र, चिचपल्ली (स्थित चंद्रपूर) सिव्हील लाईन, चंद्रपूर व www.ccfchandrapur.com या संकेतस्थळावर उपलब्ध होणार आहे. प्राप्त झालेल्या अर्जाची छानणी झाल्यानंतर उमेदवारांची बांबूवर आधारीत कौशल्य चाचणी व अभियोग्यता चाचणी घेण्यात येणार आहे. यामध्ये उत्तीर्ण झालेल्या पात्र उमेदवारांची या अभ्यासक्रमासाठी निवड करण्यात येणार आहे. अशी माहिती बांबू संशोधन व प्रशिक्षण केंद्रातर्फे देण्यात आली.
सदरचा अभ्यासक्रम हा 4 सत्राचा असून त्यामध्ये बांबू विषयीचे मुलभूत ज्ञान, प्रात्याक्षिक अभ्यासासाठी इंडियन प्लायवूड इंडस्ट्रिज रिसर्च ॲन्ड ट्रेनिंग इन्स्टीटयुट, (IPIRTI) बेंगरुळ, इन्टीटयुट ऑफ वुड सायन्स ॲन्ड टेक्नोलॉजी (IWST) बैगलोर, व बांबू ॲन्ड केन डेव्हेलपमेंन्ट इन्स्टीटयुट, (BCDI) आगरतला, त्रिपूरा येथे अभ्यास दौऱ्यासाठी विद्यार्थ्याना पाठविण्यात येईल. डिप्लोमा इन बांबू टेक्नोलॉजी हा पदविका अभ्यासक्रम वित्त विभागाचे अतिरीक्त मुख्य सचिव व्हि. गीरीराज यांच्या संकल्पनेतून वनविभागाचे सचिव विकास खारगे व नागपूर विभागाचे प्रधान मुख्य वनसंरक्षक श्री.भगवान यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू होत आहे.
महाराष्ट्रामध्ये बांबूच्या विकासासाठी व बांबूवर आधारीत समुदायाच्या विकासासाठी सुधीर मुनगंटीवार यांच्या संकल्पनेतून बांबूपासून तयार होणारी आगळीवेगळी बांबू संशोधन व प्रशिक्षण केंद्राची वास्तू चिचपल्ली येथे साकार होत आहे. या संस्थेची वाटचाल नागपूर बांबू विकास मंडळ व्यवस्थापकीय संचालक टी. एस.के.रेड्डी व चंद्रपूर वनवृत्तचे मुख्य वनसंरक्षक विजय शेळके यांचे मार्गदर्शनाखाली व चिचपल्ली बांबू संशोधन व प्रशिक्षण केंद्राचे संचालक राहुल पाटील यांचे नेतृत्वात सुरू आहे.
000
No comments:
Post a Comment