चंद्रपूर,23 सप्टेंबर- सिनाळा येथील प्रितम वसंत सहारे हे दिनांक 8 सप्टेंबर 2017 रोजी बिबट्याच्या हल्यात मृत्यूमुखी पडले होते .राज्य शासनातर्फे आज सहारे कुटुंबाचे सांत्वन करण्यात आले. मृतकाची आई वनमाला सहारे यांना 7 लाख रुपयांचा धनादेश देत आर्थिक मदत करण्यात आली .
वनजीवांच्या हल्ल्यात अघटीत घडल्यास तातडीने वाढीव मदत निधीसह कुटुंबाला मदत करण्याचे निर्देश पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिले आहेत. त्यानुसार प्रितम सहारे यांच्या कुटुंबाला तातडीने मदत करण्यात आली आहे. विभागीय वन अधिकारी सोनकुसरे, तहसिलदार संतोष खांडरे, वन विभागाच्या श्रीमती जगताप यांच्या हस्ते धनादेश प्रदान करण्यात आला. यावेळी सहारे कुटुंबाला तातडीने मदत मिळावी यासाठी सामाजिक कार्यकर्ते शैलेंद्रसिंग बैस यांच्यासह सरपंच गिता वैद्य, उपसरपंच बंडु रायपुरे, जि.प. सदस्या रोशनी खान, हनुमान काकडे, देवानंद थोरात, फारुक शेख, किशोर मांडवकर, जिवनकला मांडवकर, गावचे पोलिस पाटील तसेच वनविभागाचे अधिकारी उपस्थित होते. यावेळी मृतकाच्या कुटूंबातील सदस्यांची सात्वंना करण्यात आली.
000
No comments:
Post a Comment