Search This Blog

Wednesday 6 September 2017

रोजगारयुक्त विकसित चंद्रपूर शहराच्या निर्माणासाठी कटीबध्द : ना. सुधीर मुनगंटीवार


अमृत योजनेतून चंद्रपूरच्या 231 कोटींच्या स्वयंचलीत पाणीपुरवठा योजनेचे भूमीपूजन

चंद्रपूर- दि.28 ऑगस्ट : चंद्रपूर जिल्ह्याच्या पुढील 50 वर्षाच्या आवश्यकतेला लक्षात घेऊन केंद्र शासनाच्या  अमृत अभियानाअंतर्गत 231 कोटींच्या स्वयंचलीत पाणीपुरवठा योजनेचे भूमीपूजन राज्याचे वित्त, नियोजन व वने मंत्री तथा पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी  आज केले. चंद्रपूर जिल्ह्याला विविध पायाभूत सुविधांनी परिपूर्ण करतांना येथील सामान्य नागरिकांना आर्थिक दृष्टया  सबळ करण्यासाठी पूर्ण प्रयत्न केले जातील, असे प्रतिपादन त्यांनी केले. या वेळी केंद्रिय गृह राज्य मंत्री हंसराज अहीर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते.
    चंद्रपूर येथील प्रियदर्शिर्नी इंदीरा गांधी सभागृहामध्ये महानगरपालिकेतर्फे क्रेंद्र शासनाच्या अमृत (अटल मिशन फॉर रिज्युवेनेशन ॲन्ड अर्बन टॉन्सफार्मेशन) अभियानाअंतर्गत 231 कोटींच्या शहराच्या पाणीपूरवठा योजनेचा आज शुभारंभ करण्यात आला. केंद्र, राज्य व महानगर पालीका प्रशासनाचा वाटा असणाऱ्या या महत्वाकांक्षी  प्रकल्पाच्या माध्यमातून  संपूर्ण शहराच्या पुढील 50 वर्षातील पेय जलाचे नियोजन करण्यात येत आहे. 16 नवीन पाण्याच्या टाकी, 527 किलोमीटर लांबी असणारी अंतर्गत पाईपलाईन , नविन पंपींग मशिन आणि केवळ एका स्किनवर कार्यान्वित असणारी स्वयंचलीत पाणीपुरवठा योजना हे या अमृत योजनेचे वैशीष्टे आहे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी  या योजनेसाठी  पुढील एक वर्षाच्या कालावधीत  काम पूर्ण करण्याचे निर्देश दिले असून या योजनेसाठी  पाण्याचे स्त्रोत्र म्हणून लवकरच आमडी, धानोरा या ठिकाणी  बंधारा बांधण्याचे कामही सुरू होईल असे, स्पष्ट केले. या वेळी व्यासपिठावर जिल्हा परिषदेचे अध्यक्ष देवराव भोंगळे, आमदार  नाना शामकुळे, महापौर अंजली  घोटेकर, जिल्हाधिकारी आशुतोष सलिल, महानगर पालीकेचे आयुक्त संजय काकडे, उपमहापौर अनिल फुलझले, स्थायी समिती सभापती राहुल पावडे, सभागृह नेता वसंतराव देशमुख, सभापती अनुराधा हजारे, माजी आमदार जैनुद्दीन जव्हेरी, माजी महापोर राखी कंचर्लावार, सभापती ब्रिजभूषण पाझारे, विजय देशमुख आदि उपस्थित होते.
    यावेळी पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी अमृत योजनेमध्ये शहराच्या या महत्वपूर्ण योजनेला समाविष्ट करतांना आलेल्या अडचणींवर कशा प्रकारे मात केली याची कल्पना दिली. चंद्रपूरच्या पायाभूत सूविधांना बळकटी आणत असतांना या शहराच्या विकासासाठी आम्ही कटिबध्द असून हि योजना देखील एका वर्षात पूर्ण करू असे त्यांनी स्पष्ट केले. माजी प्रधानमंत्री अटल बिहारी वाजपेयी यांच्या जन्मदिवसाला 25 डिसेंबर 2018 रोजी या योजनेचा शुभारंभ व्हावा असा संकल्पही त्यांनी जाहिर केला. चंद्रपूर शहराचा कायापालट करणाऱ्या अनेक प्रकल्पांना गेल्या अडीच वर्षात राबविण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. स्व. बाबा आमटे वाचनालय, प्रियदर्शीनी इंदीरा गांधी सभागृहाचे नूतनीकरण, नियोजन भवणाचे निर्माण, एल.ईडी लाईटचे लोकार्पण, शहरातील चौकांचे सौदर्यीकरण, पोलिसांच्या वसाहतीचे निर्माण, जिल्हा क्रिडा संकुलाचे अद्यावतीकरण, चंद्रपूरच्या बस स्टँडचे निर्माण, रामाळा तलावात फूट ब्रीज निर्माण करणे, चंद्रपूर शहराला सीसीटीव्ही यंत्रणेखाली आणणे, शहरातील राखीव जागांचे आरक्षण उठवून शहर विकासासाठी नवा विकास आराखडा राबविणे, शहरा नजीक ऑक्सिजन पार्कची निर्मिती, एपीजे अब्दूल कलाम बगिच्याचे विस्तारीकरण, शाळांचे बळकटीकरण अशा अनेक आघाडयांवर काम सुरू असून काही प्रकल्प लवकरच दुष्टिपथात येतील तर काहींनी शहराच्या सौदर्यात भर घातली आहे. मात्र या शहरातील बदल अनुभवतांना प्रत्येकाच्या हाताला काम मिळावे या साठी देखील आपण प्रयत्नेकरीत असल्याचे त्यांनी सांगितले.
    केंद्रीय गृह राज्य मंत्री हंसराज अहिर यांनी यावेळी संबोधित केले. ते म्हणाले, केंद्र असो वा राज्य सरकार चंद्रपूरचा विकासासाठी आमचा भक्कम पाठपुरावा सूरू आहे. अनेक योजना आगामी काळात शहरात येतील. शहराचा चेहरा मोहरा बदलत असून केंद्र शासना मार्फत मंजूर झालेल्या अमृत योजनेतून पाणीपुरवठयाची घडी नीटबसेल, असे त्यांनी सांगितले. या वेळी महाकाली मंदीर व परिसराच्या विकासासाठी 10 कोटी रूपये निधी मंजूर केल्याचे त्यांनी सांगितले. येत्या काळामध्ये चंद्रपूर ते पुर्ण नवीन रेल्वे सुरू करण्याबाबत आपला प्रयत्न अंतीम टप्यात असल्याचे त्यांनी सांगितले. चंद्रपूरला अनेक सुपरफास्ट रेल्वेसाठी थांबा मिळणार असल्याचे सूतोवाच त्यांनी केले. प्रिदर्शिनी सभागृहातील कार्यक्रमानंतर त्यांनी रामनगर येथील जलशुध्दिकरण यंत्रणेचे भूमिपूजन केले. तत्‍पूर्वी  चंद्रपूरचे आमदार नाना शामकुळे यांनी अमृत योजना ही चंद्रपूर शहरासाठी जिवनदायीनी असल्याचे स्पष्ट केले. जुन्या योजनेवर या शहराचे पाणीपुरवठयाचे भवितव्य धोक्यात आले होते. अशा वेळी दिल्लीतुन हंसराज अहीर आणि मुंबईमधुन सुधीर मुनगंटीवार हे दोन्ही नेते या योजनेसाठी मागे लागले होते. या दोघांच्या प्रयत्नाने या योजनेतील अनेक अडथळे पार करता आले. या योजनेचा अभ्यासकेल्यास चंद्रपूर शहरासाठी योजनेची आवश्यकता आणि ती तत्काळ पूर्ण होणे किती आवश्यक आहे हे लक्षात येईल. त्या मुळे आता विक्रमी वेळेत जनतेला या योजनेतुन पाणीपूरवठा देण्याची आमची जबाबदारी आहे. महापौर अंजली घोटेकर यांनी देखील या वेळी उभय नेत्यांचे ही योजना अंमलात आणण्यासाठी केलेल्या प्रयत्नांचे कौतुक केले. जनतेला ही योजना पुर्ण सुविधेसह विक्रमी वेळेत देण्याचा प्रयत्न करू असे त्यांनी सांगितले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक महानगरपालिकेचे आयुक्त संजय काकडे यांनी केले. संचलन प्रशांत आरवे यांनी केले. कार्यक्रमाला महानगरपालीकेचे सर्व नगर सेवक, पदाधिकारी व शहरातील मान्यवर उपस्थित होते.
000

No comments:

Post a Comment