Search This Blog

Wednesday 6 September 2017

खादी ग्रामोद्योग मंडळ देणार दंडव्याज माफ

चंद्रपूर,दि.21 ऑगस्ट- महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळामार्फत निरनिराळ्या उद्योगासाठी खादी आयोगाच्या सर्वसाधारण योजनेखाली उद्योजकांना अर्थसहाय्य उपलब्ध करुन दिले जाते.
अशा उद्योजकाने (लाभार्थ्याने) ज्या उद्योगासाठी कर्ज घेतले. त्याच उद्योगासाठी कर्जाचा योग्य विनियोग करुनही लाभार्थी यशस्वीपणे व्यवसाय करु शकला नाही आणि नियमित कर्जाचा हप्ता भरु शकलेला नाही. अशा प्रकरणी थकबाकीदार उद्योजकाने कर्जाचे मुद्दल व सरळ व्याजाची रक्कम एकमुस्त भरणा मंडळाकडे केल्यास कर्जावरील नियमानुसार दंडव्याज माफ करण्याचे अधिकार खादी आयोगाने मंडळाचे मुख्य कार्यालय मुंबई यांना प्रदान केले आहे.
सदर लाभार्थ्यानी एकमुस्त थकीत रकमेचा मुद्दल व सरळ व्याजासह रक्कम भरणा करुन दंडव्याज माफीचा लाभ घ्यावा असे आवाहन जिल्हा ग्रामोद्योग अधिकारी खादी व ग्रामोद्योग मंडळ चंद्रपूर यांनी केले आहे.
                                                                                          0000

No comments:

Post a Comment