चंद्रपूर दि 23 सप्टेंबर :- दीर्घ कालावधीत पाऊस न आल्याने चंद्रपूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांची पिके धोक्यात आली आहेत. या वर्षात केवळ 42 टक्के पाऊस झाल्याने शेतकरी प्रचंड अडचणीत आला असून शेतकऱ्यांना आवश्यक मदत करण्यासाठी तातडीने पीक परीस्थितीचे पंचनामे करण्याचे आदेश देण्यात यावे, असे निर्देश राज्याचे वित्त, नियोजन व वने मंत्री तथा चंद्रपूरचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी जिल्हाधिकारी आशुतोष सलिल यांना दिले.
चंद्रपूर जिल्ह्यावर पावसाची अवकृपा झाल्याने, धानाचे, कापसाचे, सोयाबीन व अन्य सर्वच पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. गेल्या काही दिवसात महाराष्ट्रात अन्यत्र पाऊस होत असतांना जिल्ह्यात मात्र पावसाने दडी मारली आहे. त्यामुळे शेतकरी हवालदिल झाला असून त्यांना आवश्यक आर्थिक मदत करणे गरजेचे आहे. त्यासाठी तातडीने सर्व नुकसानाची पाहणी करण्यासाठी यंत्रणा कामी लावावी, असे निर्देश पालकमंत्री यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहे.
आज दुपारी या संदर्भातील पत्र पालकमंत्री यांनी जिल्हाधिकारी आशुतोष सलिल यांना दिले आहेत.
000
No comments:
Post a Comment