Search This Blog

Wednesday 13 September 2017

मिशन फुटबॉल अंतर्गत 15 सप्टेंबरला जिल्ह्यातील 30 हजार खेळाडू फुटबॉल खेळणार शाळांना फुटबॉलचे वितरण



 चंद्रपूर,दि.11 सप्टेंबर- मिशन फुटबॉल अंतर्गत महाराष्ट्रातील सर्व शाळांमध्ये 15 सप्टेंबर 2017 रोजी फुटबॉल खेळाचे आयोजन करण्यात येणार आहे. या अनुषंगाने क्रीडा व युवक सेवा संचालनालय तसेच चंद्रपूर जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयातर्फे आज जिल्हा क्रीडा संकुल चंद्रपूर येथे शाळांना फुटबॉल वाटप कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमात प्रमुख अतिथी महापौर अंजली घोटेकर, जिल्हा क्रीडा अधिकारी अनंत बोबडे,शिवछत्रपती पुरस्कार विजेते राजेश नायडू  उपस्थित होते.
सदर फुटबॉल वाटप कार्यक्रमात  जिल्ह्यातील 570 शाळांना महापौर व जिल्हा क्रीडा अधिकारी यांच्या हस्ते फुटबॉलचे वितरण करण्यात आले. या कार्यक्रमात महापौर यांनी मार्गदर्शन केले. यावेळी  शहर महानगरपालिका व ग्रामीण भागातील कमीत कमी 50 हजार मुलांनी जिल्ह्यातून सहभाग घेण्यासाठी शिक्षकांनी प्रयत्न करावे, असे त्या म्हणाल्या. या करिता जिल्हाधिकारी आशुतोष सलील  तथा जिल्हा क्रीडा परिषद चंद्रपूर यांनी मिशन फुटबॉल अंतर्गत जास्तीत जास्त खेळांडूना सहभागी करुन जागतिक वर्ल्ड कप करिता फुटबॉल संघास प्रोत्साहीत करावे. याकरीता जिल्ह्यातील 400 क्रीडा शिक्षकांना आमंत्रित करण्यात आले  होते.
        सन 2017-18 यावर्षी प्रथमच फेडरेशन ऑफ इंटरनॅशनल फुटबॉल असोसिएशन (फिफा) अंतर्गत 17 वर्षाखालील खेळाडूंसाठी फुटबॉल वर्ल्ड कप स्पर्धा घेण्यात येत आहे. या स्पर्धा 6 ते 28 ऑक्टोंबर या कालावधीत देशात भरणार असून एकूण सामन्यापैकी 6 सामने नवी मुंबईत डी.वाय.पाटील येथे होणार आहे. या स्पर्धेच्या निमित्ताने फुटबॉल या खेळाचा प्रचार व प्रसार व्हावा. शालेय स्तरावरील खेळाडूंमध्ये या खेळाची आवड निर्माण व्हावी. या दृष्टीकोनातून महाराष्ट्र फुटबॉल मिशन 1 मिलियम कार्यक्रमाची अंमलबजावणी जिल्ह्यातील सर्व शाळांमध्ये 15 सप्टेंबरला करण्यात येणार आहे. शाळेच्या मुख्याध्यापकांनी 14 व 17 वर्षाखालील मुले व मुलींचे संघ तयार करावे. मोठ्या प्रमाणात खेळाडूंना सहभागी करुन फुटबॉल मिशन 1 मिलीयम कार्यक्रमाची यशस्वी अंमलबजावणी करावी,असे आवाहन प्रशासनातर्फे करण्यात आले.
    000

No comments:

Post a Comment