Search This Blog

Wednesday 6 September 2017

जलयुक्त शिवार प्रसिध्दी अभियानासाठी पुरस्कार योजना माध्यम प्रतिनिधींकडून प्रस्तावाची मागणी

20 ऑक्टोंबरपर्यंत प्रवेशिका स्वीकारणार
जिल्हास्तरावर प्रथम 31 हजार तर विभागीयस्तरावर 50 हजाराचे पारीतोषिक


चंद्रपूर दि.24 ऑगस्ट राज्य शासनाच्या महत्वाकांक्षी जलयुक्त शिवार अभियानात उत्कृष्ट योगदान देणाऱ्या पत्रकारांना पुरस्कार देण्यात येणार आहे. जलयुक्त शिवार अभियानाची प्रचार व प्रसिद्धी  तसेच जनजागृती केली आहे, अशा पत्रकारांच्या प्रवेशिका दिनांक 20 ऑक्टोबर 2017 पर्यंत जिल्हा माहिती अधिकारी यांच्याकडे स्वीकारण्यात येणार आहे.
जलयुक्त शिवार अभियानात उत्कृष्ट योगदान देणाऱ्या पत्रकारांसाठी सुरु करण्यात आलेल्या पुरस्कारासाठी जिल्हास्तरीय विभागीय स्तरीय तसेच राज्यस्तरीय  पुरस्कार देण्यात येणार आहे. यामध्ये जिल्हास्तरावर पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जलमित्र पुरस्कार राहणार असून यामध्ये प्रथम पुरस्कार 31 हजार, द्वितीय पुरस्कार 21 हजार  व तृतीय 15 हजार बक्षीसाची रक्कम राहणार आहे. यासाठी जिल्हास्तरीय समितीकडे  प्रवेशिका सादर करणे आवश्यक आहे. या स्पर्धेसाठी बातमीदाराकडून 1 जानेवारी 2016 ते 31 डिसेंबर 2016 या कालावधीत प्रकाशित झालेले साहित्य संपादकाच्या शिफारशीसह तीन प्रतीत मागविण्यात येत आहे. चंद्रपूर जिल्हयातील माध्यमांच्या सर्व प्रतिनिधीना आवाहन करण्यात येते की, त्यांनी मोठया संख्येने प्रवेशिका सादर कराव्यात.
विभागीय पुरस्कार राजमाता जिजाऊ जलमित्र पुरस्कार या नावाने देण्यात येणार असून प्रथम पुरस्कार 50 हजार, द्वितीय 35 हजार व तृतीय 25 हजार रुपये आहे. राज्यस्तरावर महात्मा ज्योतीराव फुले जलमित्र पुरस्कार या नावाने देण्यात येणार असून यामध्ये प्रथम पुरस्कार 1 लाख रुपये, द्वितीय पुरस्कार  71 हजार व तृतीय पुरस्कार 51 हजार राहणार आहे.
इलेक्ट्रॉनिक मीडियासाठी राज्यस्तरावर तीन पुरस्कार असून यामध्ये प्रथम पुरस्कार 1 लक्ष, द्वितीय पुरस्कार 71 हजार तर तृतीय पुरस्कार 51 हजार रुपये आहे. यासाठी राज्यस्तरावर इलेक्ट्रॉनिक मीडियामध्ये मराठी वृत्तकथा प्रसारित करणाऱ्या प्रतिनिधींना हा पुरस्कार देण्यात येणार आहे.  इलेक्ट्रॉनिक मीडिया पत्रकाराने राज्यस्तरावर पुरस्कारासाठी संचालक मृद संधारण व पाणलोट क्षेत्र व्यवस्थापण पुणे यांच्याकडे दिनांक 2 नोव्हेंबर 2017 रोजी पर्यंत प्रस्ताव सादर करावेत. 
000

No comments:

Post a Comment