चंद्रपूर, दि.14 सप्टेंबर – राज्यात सुरु असलेल्या महाकर्जमाफी अभियानातील उदया 15 सप्टेंबर ही शेवटची तारीख असून शेतक-यांनी या संधीचा फायदा घ्यावा व गावागावात सुरु असलेल्या केंद्रावरुन आपला अर्ज दाखल करावा, असे आवाहन जिल्हाधिकारी आशुतोष सलिल यांनी केले आहे. दरम्यान महसूल विभागाने गेल्या काही दिवसापासून या यंत्रणेवर 24 तास निगरानी ठेवली असून पात्र शेतकरी लाभापासून वंचित राहणार नाही याची दक्षता घेण्याचे निर्देश दिले आहेत.
आज दिवसभर अनेक तालुक्यांच्या ठिकाणच्या केंद्राना जिल्हाधिका-यांनी भेट दिली. आधारकार्ड नसलेल्या शेतक-यांनी अर्ज दाखल करता येईल अथवा नाही. अशी शंका बाळगण्याचे कारण नसून प्रत्येक केंद्रातील कर्मचा-यांनी आधारच्या अडचणीमुळे ज्यांचे ऑनलाईन अर्ज भरुन घेता येत नाही. त्यांचे अर्ज पोर्टलवरील नॉनआधार बेस दस्तावेज स्कॅन करुन अपलोड करावे, असे निर्देश जिल्हाधिका-यांनी दिले.
सर्व केंद्र 24 तास सुरु ठेवण्याचे निर्देश देण्यात आले असून ऑनलाईन अर्ज करतांना आधारची अडचण असल्यास वेगळी यादी तयार करण्याचेही सांगण्यात आले आहे.
उदया शेवटची तारीख असून सर्व तहसिलदार, सहा.निबंधक, सहकारी संस्था, संवर्ग विकास अधिकारी, महाऑनलाईन व आपले सरकारचे जिल्हासमन्वक, तलाठी, ग्राम सेवक या सर्वांना उदया यंत्रणेवर लक्ष ठेवून राहण्याचे निर्देश देण्यात आले आहे.
या शिवाय विद्युत विभागाने ग्रामीण भागात लोडशेडींग करुन नये, असे निर्देशही जिल्हाधिका-यांनी दिले असून गावागावातील तरुणांनी या प्रक्रियमध्ये कोणतेही पात्र शेतकरी वंचित राहणार नाही. यासाठी स्वंयस्फूर्तीने मदत करावी, असे आवाहनही केले आहे.
000
No comments:
Post a Comment