Search This Blog

Wednesday 13 September 2017

कर्ज माफीची यादी ऑनलाईन संकेतस्थळावर उपलब्ध शेतक-यांनी आपल्या नावाची खात्री करण्याचे आवाहन

चंद्रपूर, दि.11 सप्टेंबर- छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना 2017 शासनाने सुरु केलेली असून कर्जमाफीसाठी पात्र असलेल्या शेतक-यांनी 15 सप्टेंबरपर्यंत ऑनलाईन नोंदणीhttp:/CSMSSY.in  या संकेतस्थळावर करुन अर्ज दाखल करावयाचा आहे. अर्जाची नोंदणी मोठया प्रमाणात झालेली आहे. परंतु अर्जदारांची संख्या कमी आहे. तसेच आतापर्यंत अर्ज दाखल केलेल्या शेतक-यांची यादी ऑनलाईन संकेतस्थळावर उपलब्ध झालेली आहे. शेतक-यांनी अधिकृत केंद्रावर जाऊन आपले नाव संकेतस्थळावर प्राप्त होणा-या यादीत असल्याची खात्री करुन घ्यावी.
      छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना 2017 हे संकेतस्थळ मराठीत समजेल असे असून संकेतस्थळाच्या खालील बाजूस अर्जदारांची यादी असा विभाग असून हा विभाग निवडावा आणि संकेतस्थळ उघडल्यावर आपला जिल्हा, तालुका व ग्राम पंचायत, नगरपरिषद निवडावे. त्या ग्राम पंचायत अंतर्गत असलेल्या व ऑनलाईन अर्ज भरलेल्या सर्व शेतक-यांची यादी प्राप्त होईल. त्यात आपले नाव असल्याची खात्री करुन घ्यावी. नाव नसेल तर परत ऑनलाईन अर्ज अधिकृत केंद्रावरुन भरणा करावा. तसेच ऑनलाईन अर्जामध्ये काही दुरुस्ती करावयाच्या असल्यास त्या सुध्दा संकेतस्थळावर करता येतील. तरी अधिकृत केंद्रावर दुरुस्त करुन घ्यावा. तसेच कर्ज माफीचा अर्ज भरण्याची शेवटची मुदत 15 सप्टेंबर 2017 पर्यंत आहे. तरी विहीत मुदतीपूर्वी ऑनलाईन अर्ज भरणा करावा, असे आवाहन जिल्हा उपनिबंधक आर.डी.कौसडीकर यांनी केले आहे.
                                                        000

No comments:

Post a Comment