चंद्रपूर,15 सप्टेंबर- जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र तसेच औद्योगिक प्रशिक्षण संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने औद्योगिक प्रशिक्षण संस्था चंद्रपूर येथे कौशल्यम सभागृहात उद्या सकाळी 11 वाजता रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. या रोजगार मेळाव्यात सुशिक्षित बेरोजगारांनी संगणीकृत सेवायोजन कार्ड, आवश्यक मुळ कागदपत्रे व त्यांच्या झेरॉक्स प्रतीसह स्वखर्चाने उपस्थित राहावे, असे आवाहन जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र चंद्रपूरच्या सहाय्यक संचालक यांनी केले आहे.
सदर मेळाव्यात विविध कंपनीत 233 पदे रिक्त असून या कंपनीत जाण्यास इच्छूक असलेल्या उमेदवारांची निवड करण्यात येणार आहे. नागपूर येथील हल्दीराम कंपनीत ट्रेनीचे 100 पदे असून याकरीता 10 वी पास व 12 वी पास अथवा नापास, फ्युचर ग्रुप सप्लाईस नागपूर कंपनीत ट्रेनीकरीता फक्त महिलांसाठी 50 पदे असून पात्रता 12 वी पास, आयटीआय तसेच पदवीधर असणे आवश्यक आहे. ताल मॅन्युफॅक्चरींग युनीट नागपूर कंपनीत फिटर, टर्नर, मशिनिष्ट शिट मेटल करीता ट्रेनीचे 50 पदे तसेच चंद्रपूर येथील मॅक्स लाईफ इन्शुरन्समध्ये इन्शुरन्स ॲडव्हायझरची 20 पदे, चंद्रपूर सर्व्हिसेसमध्ये फिल्ड एक्झीक्युटीव्हची 5 पदे तर डीएसके ग्रुप येथे सेल्स एक्झीक्युटीव्हची 4 व सेल्स मॅनेजरची 4 पदे भरावयाची असून याकरीता पात्रता 10 वी व 12 वी पास अशी आहे. उमेदवार 18 ते 30 या वयोगटातील असावा. सदर कंपन्यांचे व्यवस्थापक यावेळी उपस्थित राहणार आहेत.
सदर मेळाव्यात जिल्ह्यातील विविध कर्ज वितरीत करणारे महामंडळातील प्रतिनिधी, कौशल्य विकास प्रशिक्षण देणाऱ्या ( व्हिटीपी ) संस्थाचे प्रतिनिधीही मार्गदर्शन करणार आहेत. यासाठी जास्तीत जास्त उमेदवारांनी या कौशल्य विकास रोजगार मेळाव्यात उपस्थित राहून या संधीचा लाभ घ्यावा,असे कळविण्यात येत आहे.
000
No comments:
Post a Comment