चंद्रपूर, दि.24 ऑगस्ट- महाराष्ट्र शासनाचे मुखपत्र असणारे लोकराज्य घराघरात पोहचावे, यासाठी महिला आर्थिक विकास महामंडळातंर्गत (माविम) येणा-या लोकसंचालित साधन केंद्र (सीएमआरसी) या महिला बचत गटांनी पुरुषांची मक्तेदारी असणा-या वितरण व्यवस्थेला हाती घेतले आहे. आदिवासी बहूल चंद्रपूर जिल्हयात महिला बचत गटांच्या सदस्यांनी लोकराज्यचे हजारो वर्गणीदार केले आहे. तालुक्यामध्ये आता या बचत गटांच्या सदस्यामार्फत घरपोच लोकराज्य अंक पोहचविले जात आहे.
महिला बचत गटांच्या माध्यमातून जिल्हयामध्ये विविध उपक्रम सुरु आहेत. यामध्ये चंद्रपूर जिल्हयातील 15 तालुक्यांमध्ये असणा-या सेतू केंद्राचे कार्यवहन उत्तमरित्या महिला आर्थिक विकास महामंडळाच्या माध्यमातून सुरु आहे. तसेच रोपवाटीका, पशुखाद्यनिर्मिती, अगरबत्ती निर्मिती, मसाला विक्री, शेळीपालन, कुक्कुटपालन, रेडीमेट कपडयांची विक्री अशा कितीतरी क्षेत्रामध्ये महिला बचत गटांनी वेगळेपणाने काम सुरु केले आहे. आता घरपोच लोकराज्य पोहचविण्याचे काम या महिलामार्फत सुरु असून गेल्या चार महिण्यात चंद्रपूर जिल्हयामध्ये 7 हजारांपर्यत वर्गणीदार तयार करण्याचे काम या महिलांनी वरिष्ठ समन्वयक नरेश उगेमुगे व समन्वयक योगिता साठवणे यांच्या मार्गदर्शनात केले आहे. गावागावात महिलांच्या मार्फत लोकराज्य विक्री होत असून बहुतेक पुरुष वृत्तपत्र विक्रेतेच बघीतलेल्या नागरिकांकडून लोकराज्यच्या या महिला विक्रेत्यांचे स्वागत होत आहे.
60 पानांचा शासनाच्या विविध योजनांचा बहुआयामी मजकूर ग्रामीण जनतेच्या हातात केवळ शंभर रुपयात पडत आहेत. शंभर रुपयामध्ये बारा अंक नियमितपणे घरपोच मिळत असल्याचे समाधान नागरिकांना आहे. त्यामुळे गावागावातून महिला बचत गटांच्या सदस्यांकडे विद्यार्थी, पालक, कर्मचारी, विविध पक्षांचे पदाधिकारी यांच्याकडून लोकराज्य वर्गणीदार होण्यासाठी मागणी पुढे येत आहे. या शिवाय हिंदी, ऊर्दू, गुजराती व इंग्रजी महाराष्ट्र अहेड देखील या महिला सदस्यांकडून विक्रीसाठी उपलब्ध करण्यात येत आहे. जिल्हा माहिती कार्यालयाने ग्रामीण भागातील जनतेने महिला बचत गटाच्या सदस्यांच्या मार्फत लोकराज्य वर्गणीदार होण्यासाठी तसेच लोकराज्य एजंन्सी मिळविण्याकरीता जिल्हा माहिती कार्यालयाच्या 07172-252515- 9823474483 या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन केले आहे.
चंद्रपूर व तालुकानिहाय खालील व्यक्तींकडे लोकराज्य वर्गणीदार होण्यासाठी संपर्क साधावा. ब्रम्हपूरी तालुका श्रीमती विद्या लोखंडे-9822538245, गोंडपिपरी तालुका सुरेश गोंगले-8055275930, पोंभूर्णा तालुका श्रीमती वंदना बावणे- 9545500208, तालुका चिमूर तेजराज लांडे- 9975026347, नागभिड तालुका भारती गेडाम-9604094670, वरोरा तालुका श्रीमती वृंदा भगत- 9763808453, कोरपना-जिवती तालुका तारा धारगवे-9922146624, भद्रावती तालुका दक्षिणा हुमणे-9923720176, मूल-सावली तालुका देवेंद्र मेश्राम-9420418104, चंद्रपूर तालुका श्रध्दा हुसे-8390144494, चंद्रपूर शहर-विजय जाधव-9823474483, आनंद देठे-9623619731, प्रभाकर आवारी- 9975373673 या शिवाय चंद्रपूर बसस्थानकावर भोजक बुक स्टॉल व आनंद बुक डेपो या ठिकाणीही अंक विक्रीसाठी उपलब्ध आहे.
0000
No comments:
Post a Comment