ध्वनिक्षेपक व ध्वनीवर्धक वापराबाबत 1 ऑक्टोबर रोजी सकाळी 6 ते रात्री 12 वाजेपर्यंत सूट जाहीर
चंद्रपूर, दि. 30 सप्टेंबर : केंद्र शासनाच्या 10 ऑगस्ट 2017 रोजीच्या ध्वनी प्रदूषण (नियमन व नियंत्रण) सुधारित नियम 2017 व त्यासोबत दिलेल्या स्पष्टीकरणात्मक टिपणीनुसार ध्वनिक्षेपक व ध्वनीवर्धक इत्यादींच्या वापराबाबत श्रोतुगृहे, सभागृहे, सामूहिक सभागृह आणि मेजवानी कक्ष यासारख्या बंद जागांखेरीज इतर ठिकाणी जिल्ह्याच्या निकडीनुसार वर्षांमध्ये 15 दिवस निश्चित करून फक्त ध्वनीची विहित मर्यादा राखून सकाळी 6 ते रात्री 12 वाजेपर्यंत सूट जाहीर करण्याकरिता संबंधित जिल्ह्याचे जिल्हाधिकारी यांना प्राधिकृत करण्यात आले आहे.
तसेच महाराष्ट्र शासन पर्यावरण व वातावरणीय बदल विभागाच्या 27 सप्टेंबर 2022 च्या पत्रान्वये सन 2022 या वर्षामधील ध्वनीक्षेपक / ध्वनीवर्धक वापरासाठी 10 दिवस निश्चित करून राखीव ठेवण्यात आलेल्या 5 दिवसांपैकी 1 दिवस नवरात्रोत्सवाकरीता म्हणजे 1 ऑक्टोबर 2022 रोजी सकाळी 6 वाजतापासून ते रात्री 12 वाजेपर्यंत ध्वनिक्षेपक व ध्वनीवर्धक वापरासाठी सवलतीचा दिवस म्हणून निश्चित करण्यात आला आहे.
निश्चित करण्यात आलेल्या दिवशी सक्षम अधिकारी यांच्याकडून परवानगी घेऊनच त्यांनी ठरवून दिलेल्या अटी व शर्ती प्रमाणेच ध्वनिक्षेपक व ध्वनीवर्धकचा वापर करता येईल. असे आदेश जिल्हादंडाधिकारी अजय गुल्हाने यांनी निर्गमित केले आहे.
०००००००
No comments:
Post a Comment